चर्चिल यांच्या राजकीय अपत्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली मूठमाती

दाबोळी विमानतळ वाचवण्यासाठी काँग्रेसला सत्तेवरून हटविणे गरजेचे आहे, असे म्हणत काँग्रेस पक्षातून 2007 साली चर्चिल आलेमाव बाहेर पडले होते
चर्चिल यांच्या राजकीय अपत्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली मूठमाती
CEC has revoked political affiliation of Churchill Alemao Save Goa Front party Dainik Gomantak

मडगाव: दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) वाचवण्यासाठी काँग्रेसला (Congress) सत्तेवरून हटविणे गरजेचे आहे, असे म्हणत काँग्रेस पक्षातून 2007 साली बाहेर पडून चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी ‘सेव्ह गोवा फ्रंट’ (Save Goa Front) हा पक्ष स्थापन केला होता. चर्चिल आलेमाव यांनी जन्माला घातलेल्या या राजकीय अपत्याला केंद्रीय निवडणूक (CEC) आयोगाने मूठमाती देताना या पक्षाची राजकीय पक्ष म्हणून मान्यता मागे घेतली.

CEC has revoked political affiliation of Churchill Alemao Save Goa Front party
Goa Assembly Election: लिएंडर पेसने स्थानिक मच्छिमारांशी साधला संवाद

या पक्षाचे विमान हे चिन्हही गोठविण्यात आले असल्याचे आयोगाने सूचित केले आहे. 2010 साली आलेमाव यांनी हा पक्ष काँग्रेस पक्षामध्ये विलीन केला होता. या विलिनीकरणाला निवडणूक आयोगानेही मान्यता दिली होती. मार्च 2007 मध्ये चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेस पक्षाशी फारकत घेत सेव्ह गोवा फ्रंट हा नवीन पक्ष स्थापन केला होता. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत चर्चिलने 17 ठिकाणी या पक्षाचे उमेदवार उभे केले होते. त्यापैकी नावेलीतून ते स्वत: तर कुडतरीतून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स असे दोनच उमेदवार जिंकून आले होते.

CEC has revoked political affiliation of Churchill Alemao Save Goa Front party
‘आप’च्या निर्णयाचा प्रस्थापित पक्षांना ताप

त्या निवडणुकीत कुणालाही बहुमत न मिळाल्याने शेवटी सेव्ह गोवा फ्रंट काँग्रेस सरकारात सामील झाले होते. कालांतराने त्यांनी हा पक्षच काँग्रेस पक्षात विलीन केला होता. ‘मोपा विमानतळ नको, फक्त दाबोळी विमानतळच ठेवा’, हा त्यांनी त्यावेळी निवडणुकीचा मुद्दा बनविला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com