Sonali Phogat Case : भाजप महिला मोर्चा गप्प का?

सेसिल रॉड्रिग्ज यांचा सवाल; महिला मोर्चाने आवाज उठवण्याची मागणी
cecille rodrigues
cecille rodriguesDainik Gomantak

Sonali Phogat Case : राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर बलात्कार, खून, चोऱ्या असे अनेक गुन्हे घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भाजपचा महिला मोर्चा गप्प कसा? असा सवाल आम आदमी पक्षाच्या सेसिल रॉड्रिग्ज यांनी केला आहे.

सरकारने फोगट यांच्या मृत्यूनंतर कोणतीही सुरक्षा दिली नाही, विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबाने सरकारला खुनाचा संशय व्यक्त करून तक्रार नोंदवावी, अशी विनंती केली तेव्हा पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागली. आता त्यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे, तरीही भाजपचा महिला मोर्चा गप्प का? असा सवाल रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केला.

cecille rodrigues
Goa Monsoon Update : मॉन्सून 15 दिवस आधीच माघारी परतणार

आपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सेसिल म्हणाल्या की, सोनाली फोगट यांच्या मृत्यूनंतर प्राथमिक तक्रार (एफआयआर) वेळेवर का नोंदविली गेली नाही. सोनाली फोगट यांच्यासारख्या सेलिब्रिटीला संरक्षण दिले जात नाही. गोव्यातही अनेक ठिकाणी बलात्काराचे गुन्हे घडतात, पण ते गुन्हे दाखल होत नाहीत. त्यामुळे भाजपचा महिला मोर्चा कुठे आहे, असा सवालही त्यांनी केला.

महिला मोर्चा का गप्प आहे? ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे आहेत, त्यांना लोक निवडून देतात. त्याशिवाय अशा लोकांना भाजप मंत्रिपदही देते. त्यामुळे खरोखरच न्याय आहे का? भाजप सरकार हे लोकांसाठी नाही. महिला मोर्चाने याविषयी आवाज उठविला पाहिजे. त्यांनी गप्प बसून चालणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com