वालंकिनी सायबिणीचे फेस्त उत्साहात साजरे

वार्ताहर
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

‘कोविड’मुळे सणासुदीवर बंधने आली असली तरी ख्रिस्ती बांधवांनी वर्ष पद्धतीप्रमाणे मंगळवारी वालंकिणी साबिणीचे फेस्त गुण्यागोविंदाने व भक्तिमय वातावरणात साजरे केले.

दाबोळी: ‘कोविड’मुळे सणासुदीवर बंधने आली असली तरी ख्रिस्ती बांधवांनी वर्ष पद्धतीप्रमाणे मंगळवारी वालंकिणी साबिणीचे फेस्त गुण्यागोविंदाने व भक्तिमय वातावरणात साजरे केले.

दरवर्षी आठ सप्टेंबरला वालकिणी सायबिणीचे फेस्त साजरे केले जाते. वालंकिणी चेन्नई येथील चर्चमध्ये फेस्त मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. त्याच अनुषंगाने गोव्यातही ख्रिस्ती बांधव हा सण साजरा करतात. फेस्ताच्या पूर्वी नऊ दिवस नोव्हेना साजरी केल्यानंतर दहाव्या दिवशी फेस्त साजरे करण्यात आले. देशभरातील ख्रिस्ती बांधव नोव्हेनाच्या दिवसात किंवा फेस्ताच्या दिवशी जाऊन सायबिणीचे दर्शन घेत असतात. गोव्यातूनही मोठ्या संख्येने भाविक जात असत. त्यासाठी केंद्राकडून खास रेल्वे गाड्या उपलब्ध करून दिले आहेत. मात्र यंदा महामारीमुळे भाविकांना फेस्तला जाण्यास मिळाले नसल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे ख्रिस्ती बांधवांनी घरीच राहून प्रार्थना केली व हा उत्सव साजरा केला.

दरम्यान, नवेवाडे-वास्को येथे डॉमनिक फर्नांडिस यांच्या घरी वालंकिणी सायबीनीचे फेस्त भक्तिमय वातावरणात साजरा केले. नऊ वर्षापूर्वी फर्नांडिस यांनी सायबिणीची मूर्ती चेन्नई येथून आणून तिची आपल्या घरासमोर स्थापना केली होती. तेव्हापासून आजतागायत सप्टेंबरला या ठिकाणी फेस्त साजरे केले जाते. तत्पूर्वी नऊ दिवस नोव्हेना साजरा केला जातो. यात सर्व धर्मीय एकत्रित येऊन या उत्सवात सहभाग घेतात. यंदा महामारीमुळे फेस्त कमी स्वरूपात साजरे केले असले तरी भाविकांनी टप्प्याटप्प्याने दर्शन घेतले.

 

संबंधित बातम्या