गोव्यातील आंबा शौकिनांसाठी 'पर्वणी'

सुवर्णमहोत्‍सवी वर्ष: ‘गोंयचो फेस्तकार’ तर्फे 8 व 14 मे रोजी फेस्त
Mango
MangoDainik Gomantak

पणजी: ‘गोंयचो फेस्तकार’ मारियस फर्नांडिस यांच्या वतीने विविध फेस्तांचे आयोजन करण्यात येते. त्‍यातील आंब्याच्या फेस्ताचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. हे फेस्त सर्वसमावेशक असेल, या फेस्ताच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्‍यात येतील.

रविवार दि 8 मे राजी पहिले आंब्याचे फेस्त मोन्टफोर्ट अकादमी, खोर्ली येथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत तर दुसरे फेस्त 14 मे रोजी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत काकुलो मॉल पणजी येथे होणार आहे, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रकाश कामत व तानिया शिरोडकर यांचीही उपस्थिती होती.

Mango
गोव्यात मासळी दरात वाढ

आंब्याचे विविध प्रजातींचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पूर्वी गोव्यात 60 ते 70 प्रकारचे आंबे मिळायचे. मात्र, आता हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच आंबाच्या प्रजाती उरल्या आहेत. फेस्तादरम्यान मिंगेल ब्रागांझा आंब्यांच्या झाडांचे संवर्धन तसेच संगोपन कसे करावे याबद्दल माहिती देणार आहेत. तसेच जुने गोवे येथील केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्थेद्वारे विविध प्रकारच्या आंब्यांचे प्रदर्शन तसेच आंब्यापासून विविध प्रकारची उत्पादने कशी बनवावी याचे प्रात्यक्षिक सुनेत्रा तळावलीकर दाखवणार आहेत.

या कार्यक्रमात दिव्यांगांद्वारे विविध प्रकारचे कार्यक्रम देखील सादर केले जाणार असल्याचे मारियस फर्नांडिस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com