डॉ.सखाराम गुडे हायस्कूलचा स्थापनादिन विविध कार्यक्रमांसह साजरा

प्रतिनिधी
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

वजनगाळ शिरोडा येथील डॉ.सखाराम गुडे हायस्कूलचा स्थापना दिवस व डॉ.सखाराम गुडेंची जयंती विविध कार्यक्रमानिशी साजरी करण्यात आली.

शिरोडा: वजनगाळ शिरोडा येथील डॉ.सखाराम गुडे हायस्कूलचा स्थापना दिवस व डॉ.सखाराम गुडेंची जयंती विविध कार्यक्रमानिशी साजरी करण्यात आली. सर्व प्रथम काराय शिरोडा येथील डॉ. गुडेंच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी हायस्कुलचे मुख्याध्यापक महादेव प्रभू, ज्येष्ठ शिक्षक शशिकांत फडके, शिक्षिका अन्वेषा गावडे, प्राथमिक शिक्षिका स्वाती नाईक, सोनिया फळदेसाई व सुशांत नाटेकर उपस्थित होते.

हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात "देह मंदिर चित्त मंदिर" या शिक्षकांनी गायीलेल्या प्रार्थनेने झाली. यावेळी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सय्यद सुलेमान, हायस्कुलचे मूख्याध्यापक तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापक महादेव प्रभू , शशिकांत फडके व महेंद्र केंकरे यांनी डॉ.सखराम गुडे यांच्या कार्याची ओळख करुन दिली. सुशांत नाटेकर यांनी स्वलिखित कवितेचे वाचन केले. हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी " हम होंगे कामयाब" हे गीत सादर केले, त्यांना संगीत शिक्षक प्रसाद नाईक व सुहास जल्मी यानी संगीत साथ केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन‌ सुशांत नाटेकर यांनी केले तर शिया शेट हिने आभार मानले.या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली.

संबंधित बातम्या