गोव्यातील रेव्ह पार्ट्यांत ड्रग्जची माेठी उलाढाल
Celebrities Children attracted To Rave Party in GoaDainik Gomantak

गोव्यातील रेव्ह पार्ट्यांत ड्रग्जची माेठी उलाढाल

गोव्यात येणारे पर्यटक तसेच तरुण - तरुणी या रेव्ह पार्ट्यांकडे आकर्षित होतात. सेलिब्रेटींंच्या मुलांनाही गोव्याचे आकर्षण, राज्यातील पोलिस यंत्रणेवर वाढतोय ताण

पणजी: गोवा हे पर्यटन (Goa Tourism) केंद्र असल्याने मोठ्या प्रमाणात ड्रग्जची उलाढाल होत असते. किनारपट्टी भागामधील नाईट क्लब (Night Club) तसेच पब्समध्ये रात्री उशिरानंतर पहाटेपर्यंत चालणाऱ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये (rave party) सेलिब्रेटींची व धनाढ्यांची मुले (Celebrity) सहभागी होतात. या पार्ट्यांमध्ये महागड्या ड्रग्जची विक्री होते. गोव्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज (Drugs Supply) पुरवठा होत असला तरी पोलिस यंत्रणा त्यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरली आहे.

कॉर्डिला हे जहाज (Cordelia Cruise) काही दिवसांपूर्वी गोव्यातील मुरगाव (Margao) बंदरात आले होते. त्यामुळे मुंबईत एनसीबीने या जहाजावरील सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर घातलेल्या छाप्यात टाकला त्यामध्ये ड्रग्जच्या नशेत सेलिब्रेटींच्या मुलांना गजाआड करण्यात आले आहे. गोव्यात अशा रेव्ह पार्ट्या काही परप्रांतीय हॉटेल्स भाडेपट्टीवर घेऊन आयोजित करत असताना गोव्यातील पोलिस यंत्रणा मात्र कुचकामी ठरत आहे.

Celebrities Children attracted To Rave Party in Goa
Goa: वर्षभरात 11 वेळा NCB ची छापेमारी, तरीही कार्डेलिया क्रुझवर रंगली ड्रग्ज पार्टी

ड्रग्जचा पुरवठा विविध मार्गाने गोव्यात होत असला तरी त्यावर नजर ठेवण्यात गोवा एनसीबी, एएनसी तसेच दोन्ही जिल्हा पोलिस अपयशी ठरले आहेत. आतापर्यंत या पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये फक्त गांजा सापडत आहे. एमडीएमल, एलएसडी, हेरॉईन, एक्स्टसी गोळ्या, कोकेन यासारखे ड्रग्ज गोव्यात इतर राज्यातील ड्रग्ज दलाल घेऊन येत आहेत.

पोलिसांनी एखाद्या प्रकरणाचा छडा लावल्यानंतर त्याच्या मुळापर्यंत तपास करत नाहीत. गोव्यात परदेशी नागरिक ड्रग्ज प्रकरणात गुंतले असून रेव्ह पार्ट्या आयोजनासाठी त्यांच्याकडून हा ड्रग्ज खरेदी केला जातो. गोव्यात येणारे पर्यटक तसेच तरुण - तरुणी या रेव्ह पार्ट्यांकडे आकर्षित होत असतात. नाईट क्लब व रेव्ह पार्ट्या नियमांचे उल्लंघन करून पहाटेपर्यंत सुरू असतात. पोलिसांचेही अभय असल्याने ते सर्वकाही सुरू असते. ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांची साखळी शोधून काढण्यात गेल्या अनेक वर्षात गोवा पोलिसांना जमलेले नाही.

Celebrities Children attracted To Rave Party in Goa
आर्यन खानला NCB कडून अटक

एका दशकापूर्वी राज्यात पोलिस - ड्रग्ज माफिया लागेबांधे प्रकरण बरेच गाजले होते. या प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांबरोबर असलेल्या संबंधांची माहिती पुढे आली होती. त्याचा चौकशी अहवालही विधानसभेत ठेवण्यात आला होता मात्र हा अहवाल त्यानंतर गायबच झाला होता. त्यावर पुढे काही झालेच नाही. त्यामुळे राज्यातील ड्रग्ज व्यवसाय हा पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय शक्यच नाही हे लोकांनाही माहीत आहे.

गुप्तचर यंत्रणाही गतिमान

मुंबईत एनसीबीने कार्डिला जहाजावरील रेव्ह पार्टी उधळून लावून केलेल्या कारवाईत ड्रग्ज जप्त केला आहे. हे जहाज गोव्यात येणार होते यासंदर्भात पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांना विचारले असता ते म्हणाले, या जहाजाबाबत पोलिसांना काहीच माहिती देण्यात आली नाही, मात्र राज्यात ड्रग्जप्रकरणी दक्षता घेण्यात आली आहे. ड्रग्ज कायद्याखाली पोलिस कारवाई करून प्रकरणे नोंद करत आहेत. राज्यातील सर्व भागाबरोबरच किनारपट्टी भागात पोलिस अतिदक्ष असून ड्रग्जविक्री टाळण्यासाठी गुप्तचर यंत्रणाही गतिमान केली गेली आहे.

Related Stories

No stories found.