केंद्रीय मंत्र्यांनाही 60व्या गोवा मुक्तीदिन सोहळ्याचे दिले निमंत्रण

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्ली दौऱ्यावर होते. काल सोमवारी आपल्या दिल्ली भेटीत त्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, काही मंत्र्यांशी गोवा राज्याच्या संबधित अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.

पणजी : गोव्यातील पर्यटन व्यवसाय आणि पर्यटक वाढीसाठी केंद्राने अर्थसहाय्य करावे. या प्रमुख मागणीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांची भेट घेतली. सांस्कृतिक पर्यटन विकासाला गोव्यात भरपूर वाव असल्याचे पटवून देत त्यांनी येत्या 60व्या गोवा मुक्तीदिन सोहळ्यासाठी पटेल यांना निमंत्रणही दिले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्ली दौऱ्यावर होते. काल सोमवारी आपल्या दिल्ली भेटीत त्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, काही मंत्र्यांशी गोवा राज्याच्या संबधित अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. त्यापैकी केंद्रीय पशुसंवर्धन, मच्छीमारी, दुग्ध व्यवसाय मंत्री शांडिल्य गिरीराज सिंह यांची भेट घेतली. गोवा दुग्ध उत्पादनात तसेच मासळी उत्पादनात कशी वाढ करता येईल याविषयी विचारविनिमय केला.

दरम्यान गोव्यातील आदिवासी लोकांसाठी आणखी विविध विकास योजना कशा राबवता येतील याविषयी ट्रायल फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांची भेट घेवून विकासकामांविषयी चर्चा केली. प्रधानमंत्री जनधन योजनेवर विशेष लक्ष देण्यात येणार असून ती योजना राज्यातील सर्व आदिवासी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
 

संबंधित बातम्या