जीएसटी नुसान भरपाईसाठी गोव्याला केंद्राकडून 20 कोटींचा निधी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

राज्यांना देण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरपाईतील कमतरता भागविण्यासाठी वितरित झालेल्या 17व्या हफ्त्याचा भाग म्हणून गोव्याला 20.3 कोटी रुपये मिळाले.

पणजी :  राज्यांना देण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरपाईतील कमतरता भागविण्यासाठी वितरित झालेल्या 17व्या हफ्त्याचा भाग म्हणून गोव्याला 20.3 कोटी रुपये मिळाले. केंद्रीय वित्त मंत्रालयाने शुक्रवारी कोरोनामुळे जीएसटी संकलनात कमतरता असलेल्या राज्यांना साप्ताहिक 5 हजार कोटी रुपयांचा हफ्ता जाहीर केला. या वितरणानंतर केंद्राने गोव्याला जाहीर केलेली एकूण रक्कम 807.89 कोटी रुपये आहे. केंद्राच्या म्हणण्यानुसार जीएसटी भरपाईची अंदाजे 91% रक्कम राज्यांना देण्यात आली आहे. 

उद्यापासून सुरु होणार श्री मारुतीराय संस्थानचा वार्षिक जत्रौत्सव 

जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे उद्भवलेली महसुलातील अंदाजे 1.1 लाख कोटी रुपयांची कमतरता भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2020 मध्ये खास कर्ज घेण्याची प्रणाली तयार केली होती. या आठवड्यात पाच वर्षांच्या मुदतीसाठी 5.5% व्याज दराने ही रक्कम घेण्यात आली आहे. काही लक्झरी वस्तूंवर जमा झालेल्या भरपाई उपकरातून हा निधी भरून काढला जाईल.

‘स्वयंपूर्ण गोवा’चा डंका राष्ट्रीय पातळीवर गाजला; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे 1000 कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी

4,597.16 कोटी रुपयांची रक्कम 23 राज्यांना देण्यात आली आहे, तर 402.84 रूपयांची रक्कम दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि पुद्दुचेरी या तीन केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आली आहे. उर्वरित राज्ये, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या राज्यांमध्ये जीएसटी महसुलात तफावत नाही.

संबंधित बातम्या