केंद्रा कडून राज्य सरकारला 45 कोटींची मदत जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

वस्तू व सेवा करातील तफावतीची भरपाई म्हणून केंद्र सरकारने आज राज्य सरकारला 45 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

generalपणजी: वस्तू व सेवा करातील तफावतीची भरपाई म्हणून केंद्र सरकारने आज राज्य सरकारला 45 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. या आर्थिक वर्षातील हा मदतीचा पंधरावा हप्ता आहे. केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर प्रणाली लागू करताना राज्य सरकारचे प्रत्यक्षातील कर संकलन आणि वस्तू व सेवा करातील वाटा यांच्यातील तफावतीचाचा फरक पाच वर्षापर्यंत देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार दरवर्षी तफावतीची  रक्कम केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अदा केली जाते. या कालावधीत आणखीन पाच वर्षाची आता वाढ झाल्याने यंदाही वस्तू व सेवा करातील मिळकतीच्या तफावती बरोबरची रक्कम केंद्र सरकार राज्य सरकारला देत आहे.आज केंद्र सरकारने यापोटी 45 कोटी रुपयांचे सहाय्य राज्य सरकारसाठी मंजूर केले.

केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले गोवा दौऱ्यावर -

देवघर टू गोवा व्हाया महाराष्ट्र; रेल्वे मंत्र्यांकडून झारखंडला मोठ गिफ्ट -

संबंधित बातम्या