Pramod Sawant
Pramod Sawant Dainik Gomantak

म्हादईवर जलविद्युत प्रकल्पासाठी केंद्र कर्नाटकला परवानगी देणार नाही: मुख्यमंत्री

राज्य सरकार केंद्रीय जलशक्ती मंत्रालयासमोर आपली बाजू मांडणार आहे.

पणजी: वादग्रस्त म्हादई नदीवर जलविद्युत प्रकल्प राबविण्याच्या कर्नाटक सरकारच्या आदेशावर गोवा सरकारने आक्षेप घेतला आहे. राज्य सरकार केंद्रीय जलशक्ती मंत्रालयासमोर आपली बाजू मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Goa Karnataka News)

Pramod Sawant
गोव्यातील बैलपार नदीत आढळले मेलेले मासे आणि मगर

फेब्रुवारी 2022 मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, कर्नाटक भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारने म्हादई नदीवर जलविद्युत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडला मान्यता दिली आहे.

कर्नाटक (Karnataka) सरकारच्या या प्रकल्पाला केंद्र सरकार परवानगी देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी व्यक्त केला आहे. सावंत म्हणाले की, आम्हाला खात्री आहे की केंद्राने कर्नाटक सरकारला याबाबत कोणतीही परवानगी दिलेली नाही आणि भविष्यातही देणार नाही," ते म्हणाले.

Pramod Sawant
गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात जूनमध्ये

न्यायालयाने 14 ऑगस्ट 2018 च्या निवाड्यात, कर्नाटकला 13.42 tmcft पाणी वाटप केले, ज्यामध्ये वापरासाठी 5.40 tmcft पाण्याचा समावेश आहे. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राने म्हादई नदीतून 36.71 tmc, 122 tmc आणि 6.5 tmc पाण्याची मागणी केली होती.

न्यायालयाच्या (Court) निर्देशांचे उल्लंघन करून, मलप्रभा खोऱ्यात बांध बांधून म्हादईचे पाणी वळवल्याबद्दल राज्य सरकारने कर्नाटकविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com