केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 2 डिसेंबरला गोव्यात

गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह उत्तर व दक्षिण जिल्हाधिकाऱ्यांसमवेत निवडणूक यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेणार
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 2 डिसेंबरला गोव्यात

पणजी: राज्यात (Goa) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Central Election Commission) अधिकाऱ्यांचे पथक येत्या 2 डिसेंबरला गोव्यात दाखल होणार आहे. हे पथक राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह उत्तर व दक्षिण जिल्हाधिकाऱ्यांसमवेत निवडणूक यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 2 डिसेंबरला गोव्यात
'नवभारताच्या' स्वप्नपूर्तीसाठी भाजपला साथ द्या: जे.पी. नड्डा

गोव्यात दाखल होणारे अधिकाऱ्यांचे पथक विविध मतदारसंघांतील आढावाही घेणार आहे. ज्या ठिकाणी चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत, त्या ठिकाणची माहिती जमा करण्यास पोलिस यंत्रणेला सांगण्यात आले आहे. या दौऱ्यावेळी हे पथक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्याही सूचना ऐकून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात येणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 2 डिसेंबरला गोव्यात
गोवा विद्यापीठात प्रलंबित निकालातील घोटाळ्याप्रकरणी NSUI ची निदर्शने

राज्यातील मुख्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामाला दोन महिन्यांपूर्वीच सुरुवात केली असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकाही घेतल्या आहेत. अत्याधुनिक मतदान यंत्रांची चाचणी व त्याची तपासणी सुरू केली आहे. विविध मतदारसंघातील मामलेदार व अव्वल कारकून यांना प्रभाग फेररचनेसंदर्भातचे काम सोपवले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com