केंद्र सरकारने सौर ऊर्जा निर्मितीसाठी गोवा सरकारला दिली मंजूरी

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकारने ७५ सौर ऊर्जा निर्मिती क्षमता राज्य सरकारला मंजूर केली. आज त्याविषयीचे पत्र सरकारला मिळाले.

पणजी : केंद्र सरकारने ७५ सौर ऊर्जा निर्मिती क्षमता राज्य सरकारला मंजूर केली. आज त्याविषयीचे पत्र सरकारला मिळाले. राज्‍य सरकारने सौर ऊर्जा निर्मितीसाठी वीज खात्याच्या पडिक जमिनींचा शोध घेतल्यानंतर आता जलसंपदा खात्याच्या जमिनींचा शोध घेणे सुरू केले आहे.

राज्यभरात जलसंपदा खात्याकडे जमिनी आणि कालव्यांचे जाळे आहे. त्यांचा वापर सौर ऊर्जा निर्मितीसाठी करण्याचे सरकारने ठरवले आहे. ईएसएसएल या केंद्र सरकारच्या कंपनीशी राज्‍य सरकारने करार केला आहे. गोवा ऊर्जा विकास यंत्रणेच्या माध्यमातून सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प पुढे नेला जात आहे. सुरवातीला सरकारी कार्यालयांच्या छप्परावर सौर ऊर्जा निर्मिती सयंत्रे बसवण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानंतर सरकारी पडिक जमिनींचा वापर यासाठी करण्याचे ठरले. यासाठी आता जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या