केंद्र सरकार महिला सशक्तीकरणासाठी बांधील: सुखप्रित कौर

भाजप (BJP) हा असा एकमेव पक्ष आहे, की या पक्षात महिलांना महत्वाचे स्थान आणि कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखण्यात येत आहे.
केंद्र सरकार महिला सशक्तीकरणासाठी बांधील: सुखप्रित कौर
Sukhpreet KaurDainik Gomantak

डिचोली: भाजप (BJP) हा असा एकमेव पक्ष आहे, की या पक्षात महिलांना महत्वाचे स्थान आणि कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखण्यात येत आहे. महिला सशक्तीकरणावर भाजप भर देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या असून, त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळातही महिलांना योग्य ते स्थान देण्यात आले आहे. यावरुन या पक्षाची ध्येयधोरणे स्पष्ट होत आहेत.

Sukhpreet Kaur
Goa: स्वयंपूर्ण पंचायतींचा होणार गौरव; पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?

असे भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाची महामंत्री सुखप्रित कौर (Sukhpreet Kaur) यांनी डिचोली येथे म्हणाल्या. राज्यातील भाजप महिला संघटन कार्याचा आढावा घेण्यासाठी गोव्यात आलेल्या सुखप्रित कौर यांनी शनिवारी (ता.7) दुपारी केशव सेवा साधना संचलित डिचोलीतील नारायण झांट्ये विशेष मुलांच्या शाळेला भेट दिली. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. विशेष मुले ही महान असून, त्यांची सेवा ही ईश्वरी सेवा असल्याचे सुखप्रित कौर यांनी नमूद करून, विशेष शाळेत उपस्थित राहणे हे आपले भाग्य असल्याचे सांगितले.

Sukhpreet Kaur
Goa: गरीब कल्याण योजनेसाठी समिती स्‍थापन

यावेळी त्यांच्या हस्ते शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मयेचे आमदार प्रवीण झांट्ये, गोवा प्रदेश भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष डॉ. शीतल नाईक, सरचिटणीस शिल्पा नाईक, डिचोली भाजप मंडळाच्या अध्यक्ष शर्मिला पळ, महिला कार्यकर्त्या तथा नगरसेवक दीपा शेणवी शिरगावकर, दीपा पळ आणि अन्य नगरसेवक, शाळेचे अध्यक्ष सागर शेट्ये, आनंद जोशी भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर, सरचिटणीस डॉ. कौस्तुभ पाटणेकर, वल्लभ साळकर, सतिश गावकर, अजित बिर्जे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Sukhpreet Kaur
Goa: भाजप सरकारला काँग्रेसमुक्तचा विसर

लईराई देवीचे दर्शन

तत्पूर्वी सुखप्रित कौर यांनी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. मये मतदारसंघाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी सुखप्रित कौर यांचे स्वागत केले. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर,मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, महिला मोर्चाची अध्यक्ष ज्योस्त्ना चिंबूळकर, आरती बांदोडकर, कारापूर-सर्वणचे जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, शिरगावचे सरपंच अच्युत गावकर, चोडणचे सरपंच कमलाकांत वाडयेकर आदी मये मतदारसंघातील महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sukhpreet Kaur
Goa : ऑनलाईन शिक्षणाचा वनवास

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुखप्रित कौर यांनी भाजपच्या महिला संघटन कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महिलांसह सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहनही सुखप्रित कौर यांनी केले.

Sukhpreet Kaur
Goa Container ship service: मुरगाव बंदराचे सर्व शुल्क माफ

कार्यकर्ते तिष्ठत

श्रीमती सुखप्रित कौर सकाळी 9.15 वा. शिरगावला येणार होत्या. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते शिरगाव येथे श्री लईराई मंदिरात जमले होते. मयेचे आमदार प्रवीण झांट्ये हे ही त्याठिकाणी आले होते. मात्र राष्ट्रीय महामंत्री सुखप्रित कौर साडेअकरा वाजल्यानंतर शिरगावात आल्या. तोपर्यंत कार्यकर्त्यांना तिष्ठत रहावे लागले. आधीच शिरगाव येथे येण्यास जवळपास अडीच तास विलंब झाल्याने डिचोलीतील विशेष शाळेतील कार्यक्रमही लांबला. त्याठिकाणीही कार्यकर्ते तिष्ठत राहिले. काही कार्यकर्त्यांना सुखप्रित कौर नेमक्या किती वाजता येणार, त्याची कल्पनाही नव्हती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com