‘किसानों के सन्मान में, युथ कॉंग्रेस मैदान में’

  The Central Government should be repealed All three Agricultural laws
The Central Government should be repealed All three Agricultural laws

डिचोली: केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी करीत कॉंगेस कार्यकर्त्यांनी आज (बुधवारी) डिचोलीत ‘मशाल आक्रोश जुलूस’ निषेध आंदोलन केले. ‘किसानों के सन्मान में, युथ कॉंग्रेस मैदान में’, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी मागील एक महिन्यापासून कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठींबा जाहीर केला. हिवाळी अधिवेशन रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचाही कार्यकर्त्यांनी निषेध केला. 

अखिल भारतीय युथ कॉंग्रेसच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले होते. अखिल भारतीय युथ कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली येथील सेतू संगम प्रकल्पाजवळ छेडण्यात आलेल्या या ‘मशाल आक्रोश जुलूस’ आंदोलनात गोवा युथ कॉंग्रेसचे सरचिटणीस ॲड. गौतम भगत, जनार्दन भंडारी, सय्यद, साईश आरोसकर, पुष्कल सावंत, हिमांशू तिवरेकर, डिचोली युथ कॉंग्रेसचे मनोज नाईक, फिरोज बेग, जनार्दन भंडारी, उत्तर गोवा जिल्हा कॉंग्रेस समितीचे उपाध्यक्ष नझीर बेग, फिरोज बेग, साखळी गट कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज नाईक आदी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या वेदनेचे काहीच पडलेले नाही. उलट हे भ्रष्टाचारी असून, कृषी कायद्याच्या माध्यमातून हे सरकार दलाली करीत आहेत, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला.

लोकसभेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याच्या निर्णयाचाही श्री. यादव यांनी तीव्र शब्दात निषेध केला. बंगाल आणि बिहारमध्ये निवडणूक रॅली तसेचअन्य जाहीर कार्यक्रम होवू शकतात, तर मग हिवाळी अधिवेशन का होवू शकत नाही. असा प्रश्‍नही श्री. यादव यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी सरकार केवळ कॉर्पोरेट व्यक्‍तींचे हित पाहत आहेत. असा आरोप ऍड. गौतम भगत यांनी केला. 

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com