केंद्रीय प्रदूषण मंडळाने घेतली वास्कोतील कोळसा अहवालाची दखल

केंद्रीय प्रदूषण मंडळाने घेतली वास्कोतील कोळसा अहवालाची दखल
The Central Pollution Control Board took note of the Vasco Coal Report


मुरगाव: गोव्यातील काही समुद्र किनाऱ्यावर पाण्यात कोळसा सदृश वस्तू सापडल्या आहेत, तसेच वास्कोत कोळसा प्रदूषणाची मात्रा वाढू लागल्याची दखल केंद्रीय प्रदूषण मंडळाने घेऊन या संबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य प्रदूषण मंडळाला दिले आहेत.

केरी, बाणावली समुद्र किनारी वाहून आलेली भुकटी आढळून आली आहे. यामुळे कोळसा प्रदूषण सर्व दूर पोचल्याचे दिसून येत आहे. हे निदर्शून सडा येथील आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवकर यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केरी आणि बाणावली समुद्र किनारी सापडलेल्या कोळसा सदृश वस्तूंचे नमूने घेतले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com