गोव्याला जीएसटी भरपाईसाठी  केंद्राकडून १,०९३ कोटी रुपये 

विलास महाडिक
गुरुवार, 30 जुलै 2020

केंद्र सरकारने राज्ये तसेच केंद्र शासित प्रदेशांसाठी मार्च २०२० साठीचा वस्तू विक्री कर (जीएसटी) भरपाई रक्कम एकूण १३ हजार ८०६ कोटी जाहीर केली आहे.

पणजी

केंद्र सरकारने राज्ये तसेच केंद्र शासित प्रदेशांसाठी मार्च २०२० साठीचा वस्तू सेवा कर (जीएसटी) भरपाई रक्कम एकूण १३ हजार ८०६ कोटी जाहीर केली आहे. त्यानुसार गोव्याला केंद्राकडून १,०९३ कोटींची भरपाई मिळाली आहे. आर्थिक वर्ष २०१९ - २० या सालाकरीता वित्तीय मंत्रालयाने ही रक्कम दिली आहे. पुढील ऑगस्ट महिन्यात नुकसान भरपाईच्या देयकामध्ये होणारी दिरंगाई आणि अपेक्षेतील कमतरता याविषयीच्या चिंता दूर करण्यासाठी जीएसटी परिषदेची विशेष बैठक आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. राज्यांची आवश्‍यकता पूर्ण करण्यासाठी ही बैठक होणार आहे. 
 

 
 

संबंधित बातम्या