शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध:चाहर

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजकुमार चाहर यांनी आज भाजप मुख्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची भेट घेतली.

पणजी: भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजकुमार चाहर यांनी आज भाजप मुख्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची भेट घेतली. गोवा प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार वासुदेव मेंगगावकर आणि सरचिटणीस उदय प्रभूदेसाई यावेळी उपस्थित होते.

खासदार चाहर यांनी यावेळी केंद्र सरकार लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यां बाबत आणि शेतकऱ्यांच्या इतर विषयांवर गोव्याला केंद्राची सगळी मदत मिळेल,असे स्पष्ट केले.

यावेळी गोवा प्रदेश किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शांबा गावकर,गणेश गावकर,अच्युत धुळापकर,वंदना गावकर,सचिव चंद्रेश खांडेपारकर,जीवबाराव राणे आणि सागर नाईक उपस्थित होते.

संबंधित बातम्या