Chain Snatching Goa : अस्नोड्यात सोनसाखळी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांच्या अखेर मुसक्या आवळल्या

दोघा अज्ञात दुचाकीस्वार संशयित चोरांविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती.
Chain Snatching Goa
Chain Snatching GoaDainik Gomantak

Chain Snatching Goa : अस्नोडा गणेशनगर येथे एका महिलेची सोनसाखळी हिस्कावून नेल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी शोध सुरु केला होता. दोघा अज्ञात दुचाकीस्वार संशयित चोरांविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती. अखेर आज शुक्रवारी या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आलं आहे.

चेन स्नॅचिंगची ही घटना गेल्या 2 नोव्हेंबर रोजी  सकाळी 11.45 च्या वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी इवारिस्ता डिसोझा ही महिला अस्नोडा चर्चमधून घरी गणेशनगर येथे जात होती. ती वाड्यावर पोहोचताच अ‍ॅप्रिला स्कुटरवरून आलेल्या दोघा चोरांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिस्कावत तेथून धूम ठोकली. यावेळी फिर्यादी महिला किरकोळ जखमी झाली.

Chain Snatching Goa
Caves in Goa : साकोर्ड्यातील शैवपंथीय गुंफा

पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांविरूध्द 336 व 379 कलमाअंतर्गत गुन्हा नोंद केला होता. दरम्यान या घटनेवेळी परिसरातील सीसीटीव्हीत दोन्ही संशयितांची छबी कैद झाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयितांच्या छायाचित्रांसह काल गुरुवारी लूकआऊट नोटीस जारी केली होती. अखेर लूकआऊट नोटीस बजावल्यानंतर 24 तासात पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com