फातोर्ड्यात वाढत आहे ‘चेनस्नॅचिंग’

सीसीटीव्हीमुळे उघड: परिसरातील महिलांमध्ये दहशत
फातोर्ड्यात वाढत आहे ‘चेनस्नॅचिंग’
Goa Crime NewsDainik Gomantak

सासष्टी: मुरीडा, फातोर्डा या भागात स्कूटरवरुन येऊन महिलांच्या सोन साखळ्या हिसकावून पळ काढण्याच्या प्रकरणांत वाढ झाली असल्याने या परिसरातील महिला भयभीत झाल्या आहेत. तसेच त्यांना रस्त्यावरून फिरणेही असुरक्षित वाटू लागले आहे. या परिसरातील एका घरातील सीसीटीव्ही फुटेजवरून ही प्रकरणे उघडकीस येत आहेत. मात्र, यासंबंधी पोलिस अनभिज्ञ असल्याचे दिसते.

गेल्या दोन आठवड्यात असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यातील दोन प्रकार उघडकीस आले. बुधवारी झालेल्या घटनेत दुचाकीवरून दोन युवकांनी एक फ्रांसिस्का नामक महिला जी दुचाकीवरुन जात होती. तिला अडवली गेली वअडवून तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.

Goa Crime News
'गोव्यातील खाण कामगारांना वाऱ्यावर सोडू नका'

फ्रांसिस्काने सांगितले की दोन युवक दुचाकीवरुन आले व आपल्याला अडविले. नंतर हे दोन युवक जवळ आले व त्यांनी अकस्मात गळ्यात हात घालून सोनसाखळी हिसकावली. आपला दुचाकीवरील तोल गेला व आपण खाली पडले, असेही तिने सांगितले. जवळच घर असलेले सुदिन सुधीर लोलयेकर तिच्या मदतीस धावून आले, तो पर्यंत हे युवक दुचाकीवरून पसार झाले.

हे प्रसंग केवळ दुपारच्या वेळी म्हणजे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास होतात. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी विनंती लोलयेकर यांनी केली. या घटना दिवसाढवळ्या होतात, त्यामुळे हे चोरटे किती उघडपणे दहशत निर्माण करताहेत, याचा अंदाज येतो, असेही ते म्हणाले. नगरसेविका श्‍वेता लोटलीकर यांनी सांगितले, की पोलिसांनी अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

Goa Crime News
श्रेम रिसॉर्टला ‘सीआरझेड’चा दणका

महिलांमध्ये भीती, गस्त वाढवण्याची मागणी

चेन स्नॅचिंगमुळे महिला व मुले असुरक्षित असल्याचे नगरसेविका श्‍वेता लोटलीकर म्हणाल्या. काही दिवसापूर्वी एक महिला व एक लहान मुलगा रस्त्यावरून जात असताना त्यांना दुचाकीवरून येणाऱ्या युवकांनी चाकू दाखवला. लोकांनी खास करून महिला व मुलांनी दक्ष रहावे, अशी विनंती लोटलीकर यांनी केली. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com