Ponda News : फोंडा नगरपालिका नूतन मंडळासमोर आव्हानांचा डोंगर

सुवर्ण महोत्सवी प्रकल्प, उद्यानाचे सौंदर्यीकरण, बाजार प्रकल्पांबरोबर मास्टर प्लॅन प्रकल्प राबविणे आवश्यक
Chief Minister Dr. Pramod Sawant
Chief Minister Dr. Pramod SawantGomantak Digital Team

मिलिंद म्हाडगुत

फोंडा : फोंडा नगरपालिकेत रितेश नाईक यांची परत एकदा नगराध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांच्यासमोर विकास कामांच्या आव्हानांचा डोंगर आहे. त्यात सुवर्ण महोत्सवी प्रकल्प, बाजार प्रकल्पांबरोबर मास्टर प्लॅनसारखे मोठे प्रकल्प गतीने राबविणे गरजेचे आहे, असे मत फोंडावासियांचे आहे.

दिपा कोलवेकर यांची उपनगराध्यक्ष म्हणून झालेली निवड मात्र थोडीशी अचंबित करणारी होती. या जागी नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या व बिनविरोध निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका विद्या पुनाळेकर यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागेल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. पण दिपा या माजी नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्या पत्नी असल्यामुळे त्यांना प्राधान्य मिळाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Ponda Municipal Council: फोंडा नगराध्यक्षपदी रितेश तर उपनगराध्यक्षपदी दीपा कोलवेकर यांची निवड

आता पालिकेत भाजपप्रणित मंडळ आले असून मतदारसंघाचा आमदार हा सरकारात मंत्री आहे. त्यामुळे यावेळी विकासाची गंगा शहरात येऊ शकते, अशी अपेक्षा केली जात आहे. तशी नूतन मंडळासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. सुवर्ण महोत्सवी प्रकल्प, बाजार प्रकल्पाचा पडीक राहिलेला भाग कार्यान्वित करणे, मास्टर प्लॅन चालीस लावणे, प्रभागात गरजेप्रमाणे सुधारणा करणे, मासळी बाजाराचे नूतनीकरण,

फिरत्या विक्रेत्यांना जागा आखून देणे, पालिकेच्या नवीन इमारतीचे कार्य पूर्णत्वास नेणे, पालिका उद्यानाचे सौंदर्यीकरण करणे, दादा वैद्य चौकात सिग्नल्स घालणे, इत्यादी अनेक कार्ये या मंडळास तडीस न्यावी लागणार आहे. त्याशिवाय प्रत्येक प्रभागात जी काही आवश्यक कामे आहेत. ही सर्व कामे पूर्णत्वास न्यावी लागणार आहे.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Ponda Municipality News : कामाच्या धडाक्यामुळेच रितेशला बक्षिसी!

दळवी ‘वेट अँड वॉच' भूमिकेत : माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी हे फोंडा भाजपचे गटाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. यावेळी बिनविरोध निवडून आल्यामुळे तसेच हॅट्रिक साधल्यामुळे त्यांचे ‘वजन’ वाढले होते. त्याचा फायदा त्यांना नगराध्यक्ष बनण्यात होईल, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. पण ज्याच्या हातात ‘ससा तोच पारधी’ हेच राजकारणाचे तत्त्व असल्यामुळे दळवींना नगराध्यक्षपदापासून दूर राहावे लागले. त्यामुळे सध्या ते ''वेट अँड वॉच''च्या भूमिकेत दिसतात.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Ponda News : सत्तेपुढे कुणाचेही शहाणपण चालत नाही!

संगीत खुर्चीचा खेळ?

गेल्यावेळी गाजलेला संगीत खुर्चीचा खेळ, या वेळेला संपतो की काय? हे बघावे लागेल. २०१३ ते २०१८ या पाच वर्षाच्या काळात राधिका नायक याच फोंडा पालिकेच्या एकमेव नगराध्यक्ष होत्या. त्याची पुनरावृत्ती होवो, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी राजकारणात काही होऊ शकते हेही तेवढेच खरे आहे. तरीसुद्धा पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे २०२७ पर्यंत तरी नगराध्यक्ष बदल होणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे.

प्रभाग दहावर जास्त लक्ष

प्रभाग क्रमांक दहा हा सर्वात महत्त्वाचा प्रभाग. यात फोंड्याचा बाजार हा भाग येत असल्यामुळे या प्रभागाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. पण या भागातील महत्त्वाच्या बाजार प्रकल्पाचा वरचा भाग अजूनही कार्यान्वित झालेला नाही. काही दुकाने भाडे पट्टीवर दिलेली असली तरी तिथे वीज नसल्यामुळे ती बंदच आहेत. त्यामुळे हा भाग एकदम पडीक झाल्यासारखा वाटतो आहे.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Ponda News : सत्तेपुढे कुणाचेही शहाणपण चालत नाही!

आता विजेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार असल्यामुळे इथे बंद असलेली दुकाने भाडेपट्टीवर दिली जाऊ शकतात . त्यातून पालिकेलाही आर्थिक स्रोत निर्माण होऊ शकतो. या प्रभाग दहाच्या नगरसेविका दीपा कोलवेकर या आता उपनगराध्यक्ष झाल्यामुळे या प्रभागाच्या विकासावर त्या लक्ष केंद्रित करतील अशी अपेक्षा केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com