राज्यात ढगाळ वातावरणाची शक्यता

 Chance of cloudy weather in the state
Chance of cloudy weather in the state


पणजी : राज्यातील वातावरण पुढील पाच दिवस कोरड्या स्वरूपाचे आणि ढगाळ वातावरण असणार आहे. आज काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी कडक उन्ह पडले होते. 


राज्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी कमाल ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान २२.७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. वातावरणीय बदलामुळे कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळलेल्या अवस्थेत आहे. 


समुद्रावर वाऱ्याचा वेळ ४० कि. मी. प्रति तास असणार असून हा वेग ५० ते ६० कि.मी. प्रति तास इतक्या जलद गतीने वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रावर जोराचे वादळी वारे तर असणारच आहेत, पण याशिवाय लाटांची उंचीसुद्धा अधिक असणार आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात न उतरण्यासाठीचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय नागरिकांनाही समुद्रानजीक न जाण्यासाठीच्या सूचना करण्यात आल्या असून दृष्टीच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com