Goa Rain Updates : 4 ऑगस्टपासून गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

4 ऑगस्टपासून कर्नाटक किनारपट्टी आणि गोव्याच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Goa IMD Rain Update
Goa IMD Rain UpdateDainik Gomantak

मागील काही दिवसांपासून गोव्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. पावसाचे प्रमाण तुलनेत कमी दिसून आले आहे. असे असले तरी येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Goa IMD Rain Update
पहिल्या दिवशी कुटबणहून मासेमारीसाठी 15 बोटीच रवाना

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्टपासून उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 4 ऑगस्टपासून कर्नाटक किनारपट्टी आणि गोव्याच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे या काही दिवसात नागरिकांना खबरदारी घेण्याची गरज आहे.

दरम्यान, मासेमारी बंदी उठल्यावर आज खरे तर किमान 100 तरी ट्रॉलर मासेमारीसाठी समुद्रात जाण्याची आवश्यकता होती मात्र कुटबण येथे साळ नदीच्या मुखावर वाळूच्या पट्ट्याची भिंत उभी झाल्याने केवळ 10 ते 15 बोटीच मासेमारीसाठी दर्यात जाऊ शकल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com