राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

राजधानी पणजीसह राज्यात ठिकठिकाणी आज दमदार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली. आज दिवसभर राज्यभरात ढगाळ आणि थंड प्रकारचे वातावरण होते.  दरम्यान  वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात १६ ऑक्टोबरपर्यंत पावसाची  शक्यता आहे. 

 

पणजी: राजधानी पणजीसह राज्यात ठिकठिकाणी आज दमदार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली. आज दिवसभर राज्यभरात ढगाळ आणि थंड प्रकारचे वातावरण होते.  दरम्यान  वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात १६ ऑक्टोबरपर्यंत पावसाची  शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात राज्यात कमीत कमी २४ अंश  सेल्सिअस आणि जास्तीत जास्त ३० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजच्या दिवशी समुद्र किनारी वाऱ्याचा वेग सुमारे ४५ ते ५५ कि.मी. प्रतितास इतका वाऱ्याचा वेग होता, त्यामुळे मासेमाऱ्यांना समुद्रात न उतरण्यासाठीचा इशारा देण्यात आला होता. हा इशारा १६ ऑक्टोबरपर्यंत  कायम ठेवण्यात येणार आहे. कारण या कालावधीपर्यंत राज्यातील वातावरण संमिश्र स्वरूपाचे असणार आहे. 
 

संबंधित बातम्या