चंद्रकांत गवस यांना सहकार क्षेत्रातील "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून केले सन्मानित

सहकार क्षेत्रातील त्यांच्या अफाट सेवेबद्दल 2021 साठी सर्वोत्कृष्ट सहकारी म्हणून सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून 2021 साठीचा सन्मान स्वीकारताना श्री चंद्रकांत गवस
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून 2021 साठीचा सन्मान स्वीकारताना श्री चंद्रकांत गवस Dainik Gomantak

दाबोळी: गोवा राज्य सहकारी संघ लि. पणजी यांनी सहकार विभाग, गोवा सरकार (Government of Goa) आणि राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच 68 वा सहकार सप्ताह साजरा केला. वास्कोतील उद्योजक तथा लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गवस (Chandrakant Gavas) यांना सहकार क्षेत्रातील त्यांच्या अफाट सेवेबद्दल 2021 साठी "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

"सहकार सप्ताह" च्या समारोप कार्यक्रमाचे औचित्य साधून द गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लि. "सहकार संकुल" 6 व्या मजल्यावरील पाट्टो पणजी येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून 2021 साठीचा सन्मान स्वीकारताना श्री चंद्रकांत गवस
चौगुले जहाज बांधणी विभागाने विजन्ने बरेंड्सला वितरित केले सहावे जहाज!

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यात वास्कोतील उद्योजक तथा गोवा चेंबर आणि वाणिज्य आणि उद्योग, खजिनदार आणि लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गवस,यांना सहकार क्षेत्रातील त्यांच्या अफाट सेवेबद्दल 2021साठी "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून नाबार्ड गोव्याच्या महाव्यवस्थापक श्रीमती उषा रमेश व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

गोवा चेंबर आणि वाणिज्य आणि उद्योगासाठी (industry) ही अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे की आमचे खजिनदार आणि लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत के गावस यांना सहकार क्षेत्रातील त्यांच्या अफाट सेवेबद्दल 2021 साठी "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून सन्मानित करण्यात आले असल्याचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com