गोवाः चंद्रकांत कवळेकरांकडून उमेदवारांना भूखंडांची ‘ऑफर’

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

केपे पालिकेच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरनियोजनमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी कॉंग्रेस समर्थक उमेदवारांना भूखंडांची ऑफर दिली होती.

मडगाव:  केपे पालिकेच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरनियोजनमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी कॉंग्रेस समर्थक उमेदवारांना भूखंडांची ऑफर दिली होती. जमीन रूपांतरीत करून देवून त्यांनी हे भूखंड बेकायदेशीरपणे मिळविले असतील, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. कवळेकरांच्या या व्यवहारांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Chandrakant Kavalekar offers plots to candidates)

पणजी महापालिकेची ‘ट्रेंडस’वर कारवाई

केपे येथे कॉंग्रेसने पाठिंबा दिलेल्या युनायटेड फ्रंट ऑफ केपेच्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर चोडणकर पत्रकार परिषदेत बोलत होते.  कॉंग्रेसचे केपे गाटाध्यक्ष मानुएल कुलासो, केप्याचे नेते एल्टन डिकॉस्ता, सेन्झील डिकॉस्ता, अ‍ॅड. जॉन फर्नांडिस यावेळी उपस्थित होते. युनायटेड फ्रंट ऑफ केपे या पॅनलने पालिका निवडणुकीसाठी 12 उमेदवारांची घोषणा केली आहे. 
ज्यांच्याकडे बेकायदेशीरपणे कमावलेली संपत्ती आहे, तेच असे ऑफर देवू शकतात. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी पैशांची ऑफर केली जाते हे आतापर्यंत ऐकले आहे, परंतु कवळेकर यांनी भूखंड देण्याचा नवीन ट्रेंड सुरू केला आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

सासष्टीकरांनो सावधान! कोरोनाची रुग्णांची संख्या ठरतेय चिंता वाढवणारी

कॉंग्रेसच्या पाठिंब्याने निवडणूक लढविणाऱ्या कित्येक उमेदवारांना ही ऑफर कवळेकरांकडून मिळाली होती, परंतु त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला आहे, असे ते म्हणाले. निवडणूक  हरण्याच्या भीतीने भाजपने त्यांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही, असेही चोडणकर म्हणाले.  ही निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास भाजपमध्ये असेल तर त्यांनी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान चोडणकर यांनी कवळेकर यांना दिले.युनायटेड फ्रंट ऑफ केपे पॅनलचे उमेदवार - युनायटेड फ्रंट ऑफ केपे गटाचे  उमेदवार असे आहेत -  जगदीश गवळी (प्रभाग - 1), राजेश नाईक (प्रभाग -2), नझमोनिशा खान (प्रभाग-3), योगेश बेणे (प्रभाग 4), नेशविन मार्टिन (प्र. 5), प्रतिका मडगावकर (प्र. 6), चेतन नाईक ( प्र. 7), मानुएल कुलासो (प्र. 8), जॅकीना डायस ( प्र. 9), नंदिता प्रभुदेसाई ( प्र. 10), लॅक्वेदा आलिंदा जोएनिटा ( प्र.11), पॉवलिन फर्नांडिस ( प्र.13).

संबंधित बातम्या