ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांना चंद्रकांत केणी स्मृती पुरस्कार जाहीर
दिवंगत पत्रकार चंद्रकांत केणी Dainik Gomantak

ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांना चंद्रकांत केणी स्मृती पुरस्कार जाहीर

पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी मडगाव पालिका सभागृहात आयोजित करण्यात आला असून कोंकणी चळवळीतील ज्येष्ठ नेते उदय भेंब्रे यांचे मुख्य भाषण होणार आहे.

मडगाव: 'गोंय आणि गोंयकार' हे ब्रीद घेऊन आदर्श गोवा राज्य बनविण्यासाठी आपल्या पत्रकारितेचा वापर करणारे दिवंगत पत्रकार चंद्रकांत केणी (Chandrakant Keni) यांची ही विचारसरणी घेऊन आपली पत्रकारिता (Journalism) केलेले दुसरे ज्येष्ठ पत्रकार आणि दै. नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे यांना पहिला चंद्रकांत केणी स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

स्व. केणी यांच्या जयंतीदिनी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी मडगाव पालिका सभागृहात होणाऱ्या एका समारंभात प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या हस्ते हा पुरस्कार (Awards) दिला जाणार आहे.

दिवंगत पत्रकार चंद्रकांत केणी
मडगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कामावर बहिष्कार

वाळवे यांनी आपल्या पत्रकारितेचे प्राथमिक धडे दै. राष्ट्रमतमध्ये चंद्रकांत केणी यांच्याचकडून घेतले होते. पुढे दै. नवप्रभामध्ये त्यांनी केणी यांचीच 'गोंयकारवादी' (Gonyakarvadi) विचारसरणी पुढे नेली. वाळवे यांच्या अग्रलेखातून ही विचारसरणी सतत प्रकट झाली होती. यासाठीच त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता मडगाव पालिका सभागृहात आयोजित करण्यात आला असून कोंकणी चळवळीतील ज्येष्ठ नेते उदय भेंब्रे यांचे मुख्य भाषण होणार आहे. यावेळी साहित्यिक दत्ता दामोदर नाईक, पत्रकार राजू नायक व प्रमोद आचार्य हे उपस्थित राहाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com