मंत्रिपद नाहीच, डिचोलीवासियांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा

डॉ. चंद्रकांत शेट्येंना मंत्रिपदाची हुलकावणी, दुसऱ्या टप्प्यातही स्थान नसल्याने नाराजी
Chandrakant Shetye
Chandrakant ShetyeDainik Gomantak

डिचोली : डिचोलीतून अपक्ष उमेदवारीवर निवडून आलेले डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा असतानाच अचानक यादीतून त्यांचं नाव मागे पडलं आणि मंत्रिपदाने डिचोलीला पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यातही डिचोली मतदारसंघाला स्थान मिळाले नसल्याने डिचोलीवासियांचा अपेक्षाभंग झाला आहे.

Chandrakant Shetye
मंत्रीपद मिळाल्यास दुधात ‘साखर’: डॉ. चंद्रकांत शेट्ये

डिचोली मतदारसंघाला यावेळी मंत्रिपदाचा योग असल्याचे संकेत निवडणुकीपूर्वी मिळाले होते. मात्र भाजपचे उमेदवार आणि माजी सभापती राजेश पाटणेकर यांचा पराभव झाला. राजेश पाटणेकर विजयी झाले असते तर त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती. मात्र पाटणेकर यांना हरवत डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोलीची जागा जिंकली आणि भाजपच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, मगोपचे (MGP) सुदिन ढवळीकर आणि डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना नवीन सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याचे संकेत मिळाले होते.

Chandrakant Shetye
मंत्रिमंडळाचा विस्तार; ढवळीकरांसह दोन मंत्र्यांचा शपथविधी

मिळालेल्या माहितीनुसार गोवा भाजप (BJP) प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही डॉ. शेट्ये यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. मात्र डिचोलीला अखेरपर्यंत मंत्रिपद काही मिळू शकलं नाही. गेल्या जवळपास वीस वर्षांपासून डिचोली मतदारसंघ मंत्रिपदापासून वंचित आहे. 1972 साली झालेल्या निवडणुकीत डिचोली मतदारसंघातून निवडून आल्यानंतर स्व. शशीकला काकोडकर यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. त्यानंतर डिचोलीतून निवडून आलेले स्व. हरिष झांट्ये, स्व. पांडुरंग भटाळे यांच्यासह पांडुरंग राऊत यांनी मंत्रीपद उपभोगले आहे. पांडुरंग राऊत यांच्यानंतर म्हणजेच 2002 सालापासून डिचोली (Bicholim) मतदारसंघाला मंत्रीपद मिळालेले नाही. गेल्या सरकारमध्येही अडीच वर्षांपूर्वी भाजपचे तत्कालीन आमदार राजेश पाटणेकर यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित झाले होते. मात्र शेवटच्या क्षणी ते मंत्रिपदाच्या शर्यतीतून मागे पडले आणि त्यांची सभापतीपदी वर्णी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com