नवीन अधिसूचनेमुळे मडगावमधील प्रभागांमध्ये बदल 

नवीन अधिसूचनेमुळे मडगावमधील प्रभागांमध्ये बदल 
Changes in 15 wards in Goa due to new notification

मडगाव ः मडगाव पालिकेच्या प्रभाग राखीवतेत बदल झाल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनाही फटका बसला आहे. महिला राखीव प्रभागाच्या संख्येत एकाने वाढ होऊन 9 प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर प्रभाग 14 अनुसूचित जाती (एससी) महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 

प्रभाग राखीवतेच्या नवीन अधिसूचनेचा फटका माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा व राजेंद्र आजगावकर, माजी नगरसेवक रुपेश महात्मे, केतन कुरतरकर, दामोदर रामनाथ नाईक, ग्लेन आंद्राद, माजी नगरसेविका सुगंधा बांदेकर यांना बसला आहे. 

मडगाव पालिकेचे 25 पैकी 14 प्रभाग महिला, ओबीसी महिला, एससी महिला व एसटी महिला, एसटी व ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आले असून 11 प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुले आहे.य

नवीन अधिसूचनेनुसार प्रभाग 2 ओबीसी, प्रभाग 3 ओबीसी महिला, प्रभाग 5 महिला, प्रभाग 6 एसटी, प्रभाग 10 ओबीसी, प्रभाग 13 महिला, प्रभाग 14 एससी महिला,  प्रभाग 18 ओबीसी महिला, प्रभाग 17 ओबीसी, प्रभाग 19 ओहीसी महिला, प्रभाग 20 महिला, प्रभाग 22 ओबीसी, प्रभाग 23 एसटी महिला, प्रभाग 25 महिलासाठी राखीव आहे. तर प्रभाग 1, 3, 6, 7, 9, 11. 12, 15, 18, 21 व 24 सर्वसाधारण गटासाठी खुले आहेत. 

नवीन अधिसूचनेमुळे 15 प्रभागांच्या राखीवतेत बदल झाला आहे. प्रभाग 1, 2, 3, 8, 12. 15. 16, 19, 20 व 25 मध्ये बदल झालेला नाही. त्यामुळे या प्रभागातील उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. तथापि, इतर प्रभागांमध्ये राखीवतेत बदल झाल्याने उमेदवारांना थेट फटका बसला आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com