Goa Shigmotsav 2023: गोव्यातील शिगमोत्सवाच्या तारखांत बदल, 'या' आहेत नव्या तारखा

वास्को, मडगाव, शिरोडा आणि धारबांदोडा येथील तारखांत बदल नाही
Goa Shigmotsav 2023
Goa Shigmotsav 2023 Dainik Gomantak

Goa Shigmotsav 2023: गोव्यात पारंपरिक उत्साहात साजरा केला जाणाऱ्या शिगमोत्सवाच्या तारखांमध्ये काही बदल करण्यात आला आहे.

त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी आता शिगमोत्सव सुधारीत तारखेदिवशी होणार आहे. राज्याच्या पर्यटन संचलकांनी याबाबतची नवे परिपत्रक जारी केले आहे.

Goa Shigmotsav 2023
Goa GI Tag: आगशीच्या वांग्याला जीआय मानांकन

पुर्वीच्या नियोजनानुसार पणजीत 11 मार्च, पर्वरीत 12 मार्च, म्हापसा 13 मार्च, पेडणे वाळपई येथे 14 मार्च, सांगे 15 मार्च, केपे-कुडचडे 16 मार्च, वास्को 17 मार्च, मडगाव 18 मार्च, शिरोडा आणि धारबांदोडा येथे 19 मार्च, कुंकळ्ळी 20 मार्च आणि काणकोन येथे 21 मार्च रोजी शिगमोत्सव नियोजित होता. यातील काही ठिकाणच्या तारखांमध्ये बदल झाला आहे.

त्यानुसार आता 12 मार्च रोजी पर्वरीसह म्हापशातही शिगमोत्सव असणार आहे. पुर्वीच्या नियोजनात म्हापशातील शिगमोत्सव 13 मार्च रोजी होती. तर नव्या नियोजनात 13 मार्च रोजी कुडचडे येथे शिगमोत्सव असेल.

14 मार्च रोजी केवळ पेडणेत शिगमोत्सव होईल. तर वाळपईत 16 मार्च रोजी शिगमोत्सव असेल. याशिवाय केपे आणि कुंकळ्ळी येथे 20 मार्च रोजी शिगमोत्सव असेल.

Goa Shigmotsav 2023
Goa Crime News : चोरट्यांचा दिल्ली पर्यटकांच्या आयफोनवर डल्ला! वेर्णा पोलिसात गुन्हा नोंद

अशा आहेत शिगमोत्सवाच्या नव्या तारखा

दिनांक ठिकाण

11 मार्च -------------- पणजी

12 मार्च -------------- पर्वरी आणि म्हापसा

13 मार्च -------------- कुडचडे

14 मार्च -------------- पेडणे

15 मार्च -------------- सांगे

16 मार्च -------------- वाळपई

17 मार्च -------------- वास्को

18 मार्च -------------- मडगाव

19 मार्च --------------- शिरोडा आणि धारबांदोडा

20 मार्च --------------- केपे आणि कुंकळ्ळी

21 मार्च ---------------- काणकोण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com