राज्यातील बंद असलेली चार्टर विमानसेवा पुन्हा सुरु होण्याची शक्यता

ऑक्टोम्बर महिन्याच्या मध्यापासून बंद असलेली चार्टर विमानसेवा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाल्यांमुळे; पर्यटन क्षेत्र मुळ पुन्हा स्वरुपात सुरु होईल
राज्यातील बंद असलेली चार्टर विमानसेवा पुन्हा सुरु होण्याची शक्यता
Charter flights will start again in goaDainik Gomantak

पणजी: कोरोना (Corona) महामारीमुळे गेले दिड वर्ष बंद असलेली चार्टर विमानसेवा (Charter Airlines) व देशातील पर्यटन क्षेत्र पुर्ण स्वरुपात पुन्हा खुले करण्याचा प्रस्ताव केंद्रिय गृहमंत्रालयाच्या विचाराधीन आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे गोवा टुअर्स ॲण्ड ट्रोवेल संघटनेने (टीटीएजी) स्वागत केले आहे.

Charter flights will start again in goa
चर्चिल कन्येचा नावेलीतून प्रचार सुरू

ऑक्टोम्बर महिन्याच्या मध्यापासून बंद असलेली चार्टर विमानसेवा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाल्यांमुळे राज्यातील विशेषता लहान व मध्यम हॉटेलचालक खुश झाले आहेत. याबाबत टीटीएजी चे अध्यक्ष निलेश शहा यांनी सांगितले की गोव्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक दरवर्षी येतात. गोव्याचे पर्यटन विदेशी पर्यटकाशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. हे पर्यंटक गोव्यात आल्यानंतर लहान व मध्यम हॉटेलात राहतात. कारण ते १४ ते २१ दिवसासाठी गोव्यात आलेले असतात. चार्टर विमाने सुरु झाल्यास मध्यम व लहान हॉटेलचालकांना व्यावसाय मिळेल. व बेरोजगार झालेल्यांना रोजगारही मिळणार आहे.

Charter flights will start again in goa
समुद्र किनाऱ्यावर गाडी चालविल्याच्या आरोपातून मिकी पाशेको निर्दोष मुक्त

टीटीएजी तर्फे गेले काही महिने चार्टर विमाने सुरु व्हावीत अशी मागणी सातत्याने करत आहे. आम्ही केंद्र व राज्य सराकरकडे तशी मागणी केली आहे केंद्रिय पर्यंटन मंत्री किशन रेड्डी हे गोव्यात आले होते तेव्हा त्यांना चार्टर विमाने सुरु करण्याचे निवेदन टीटीएजीने दिले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रोमोद सावंत यानाही टीटीएजीच्या शिष्टमंडळाने भेटून चार्टर विमाने सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. या मागणीचे निवेदन दिले होते. असे शहा यांनी सांगितले. राज्यातील पर्यटन उद्योक नुकताच सुरु झालेला असल्याने चार्टर विमाने सुरु होणे गरजेचेआहे. मात्र त्यासाठी पहिल्यांदा व्हीसा प्रक्रिया सुरु व्हायला हवी. अशी सूचना शहा यांनी केली.

Related Stories

No stories found.