आजच्या राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करावेत: डॉ. फाळके

शिवाजी महाराचांचे हे गुण आजच्या राजकारण्यांनी आत्मसात करावे त्यामुळे जनतेसाठी कल्याणकारी योजना तयार करणे तसेच राम राज्य देशात प्रस्थापित करणे शक्य होईल
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj JayantiDainik Gomantak

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्यकर्ते नव्हते तर त्यांना आपल्या लोकांबद्दल प्रेम होते, ओढ होती. ते कधी इतरांपुढे झुकले नाहीत तर त्यांनी इतरांना आपल्या समोर झुकवले. त्यानी भुतकाळातील घटनांच्या अनुभवाच्या जोरावर वर्तमानामध्ये योग्य निर्णय घेतले व भविष्यासाठी तरतुद ही करुन ठेवली.

ते प्रयोगशील होतेच शिवाय बदल स्विकारण्याची त्यांची तयारी असे व सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना वैश्विक सत्याची जाण होती. शिवाजी महाराचांचे हे गुण आजच्या राजकारण्यांनी आत्मसात करावे त्यामुळे जनतेसाठी कल्याणकारी योजना तयार करणे तसेच राम राज्य देशात प्रस्थापित करणे शक्य होईल असे ओजस्वी वक्ते, इतिहासकर, प्रतिभावंत लेखक व शिवाजी महाराजांचे गाढे अभ्यासक डॉ. केदार फाळके यानी सांगितले.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Goa Illegal Mine : बेकायदेशीर खाणकामाच्या चौकशीसाठी असलेल्या 'SIT'मध्ये एकच सदस्य? पोलीस म्हणतात...

अजिंक्यतारा युवा क्रांती संस्थे तर्फे शुक्रवारी तिथी नुसार आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाते ते प्रमुख वक्ते म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रामाचे प्रमुख पाहुणे म्हणुन कौतुक बाळे व संस्थेचे संस्थापक शर्मद पै रायतुरकर उपस्थित होते.

"छत्रपती शिवाजी महाराज - काल. आज व उद्या" या विषयावर बोलताना डॉ. फाळके यानी शिवाजीचे धैर्य, निष्कलंक चारित्र्य, जाणता राजा, आरमाराची उभारणी. तत्वांशी तडजोड नाही, स्वराज्याची संकल्पना तसेच त्यांचे संघटन व सत्तेचे विकेंद्रीकरण, मानवी संसाधन विकास, ऐक्य, स्थापत्य, चुकांमधुन शिक्षण तसेच अत्युत्कृष्ट नियोजन, वित्त व्यवस्था, भाषेची चळवळ या सारख्या त्यांच्या अनेक पैलुवर प्रकाश टाकला. तसेच दिल्ली जिंकणे हे त्यांचे ध्येय होते असेही डॉ. फाळके यानी सांगितले.

त्यानी शिवाजी महाराजांच्या गोमंतकाकडील संबंधाची पण माहिती या प्रसंगी दिली. महाकवी भूषण रचित छंद आळवुन त्यानी आपल्या व्याख्यानाची सांगता केली तसेच गोव्यातील सप्तकोटेश्र्वर मंदिराचे महत्व ही सांगितले व या देवळाची पुर्नबांधणी केल्याबद्दल गोवा सरकारचे आभारही त्यानी व्यक्त केले.

प्रमुख पाहूणे या नात्याने बोलताना कौतुक बाळे यानी सांगितले की 1695 साली पोर्तुगीज लेखकाने सुद्धा शिवाजी महाराजाचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला होता ही माहिती दिली. 400 वर्षांपुर्वी जन्मास आलेली व्यक्ती आजच्या पिढीला सुद्धा प्रेरणा देते याचवरुन शिवाजी महाराजांचा मोठेपणा सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. शिवाजी महाराजांच्या जीवनावर, त्यांच्या राज्यपद्धतीवर जास्तित जास्त संशोधन होणे गरजेचे असल्याचे बाळे यानी सांगितले.

आपल्या स्वागतपर भाषणात शर्मद पै रायतुरकर यानी सांगितले की  गोमंतकाची संस्कृती शिवाजी महाराजांशिवाय पुर्ण होणार नाही. शिवाजी हे देशाचे प्रेरणास्थान व ते संस्कृतीचे परमोंच बिंदू असल्याचे रायतुरकर यानी सांगितले. मडगावात शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा हट्टही त्यानी धरला.

या वेळी शिवसाम्राज्य संस्था, शिवरायांचे मावळे, श्रीकृष्ण युवक मंडळ यांच्या प्रतिनिधींचा गौरव यावेळी करण्यात आला. नवनाथ खांडेपारकर यानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर गौतम नाईक यानी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com