Goa Eco-Friendly Ganesh: गोव्यात निवडणुकीवर आधारीत गणपती डेकोरेशन स्पर्धा; 15 सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

गोवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजन
Eco -Friendly Ganesh Decoration Competition on Election Theme
Eco -Friendly Ganesh Decoration Competition on Election ThemeDainik Gomantak

Eco -Friendly Ganesh Decoration Competition on Election Theme:

चैतन्योत्सव घेऊन येणाऱ्या गणराचाये आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्यात तयारीला वेग आला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आता गोव्यातील निवडणूक अधिकाऱ्यांनीही विविध उपक्रम सुरू केले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्यावतीने इको फ्रेंडली गणेश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माझे मत, माझ्या देशासाठी अशा जनजागृतीसाठी ही स्पर्धा घेतली जात आहे.

गोव्याच्या रहिवाशांना कुठल्याही वयोगटातील नागरिकांना या स्पर्धेत भाग घेता येईल.

Eco -Friendly Ganesh Decoration Competition on Election Theme
Girish Chodankar: मंत्री रोहन खंवटेंमुळे पर्वरीत जंगलराज! पर्वरी 'क्राईम कॅपिटल' बनली; न्यायाधीश, वकीलांमध्ये भीती

कसे सहभागी व्हाल?

या स्पर्धेत सहभागासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी 15 सप्टेंबर ही अंतिम मुदत असणार आहे. नोंदणीसाठी तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर मेलद्वारे ceo_goa@eci.gov.in यावर पाठवायचा आहे. या स्पर्धेत सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही.

तर इको फ्रेंडली डेकोरेशन एंट्री पाठविण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर आहे. तुम्ही साकारलेल्या निवडणूक आधारीत गणेश डेकोरेशनचे तीन फोटोज या मेलवर पाठवायचे आहेत.

Eco -Friendly Ganesh Decoration Competition on Election Theme
Francisco Sardinha: चांद्रयान एका दिवसात बनले नाही; त्याचा पाया काँग्रेसने घातला...

बक्षिसे अशी...

या स्पर्धेत एकूण तीन विजेते काढण्यात येणार आहेत. पहिल्या क्रमांकासाठी 15 हजार रूपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 10 हजार रूपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी 5 हजार रूपये बक्षीस आहे. विजेत्यांना राज्य मतदार दिनाच्या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे.

सर्जनशीलता, थीमचा वापर याच्या आधारे तीन जजेसचे पॅनेल विजेत्याची निवड करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com