मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनाम द्यावा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

काणकोण येथील चापोली धरणावर चित्रित झालेल्या अश्लील व्हिडिओप्रकरणी सरकारी यंत्रणेकडून झालेल्या हलगर्जीपणाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी केली आहे. 

मडगाव : काणकोण येथील चापोली धरणावर चित्रित झालेल्या अश्लील व्हिडिओप्रकरणी सरकारी यंत्रणेकडून झालेल्या हलगर्जीपणाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी केली आहे. 

गोव्यात चित्रिकरणासाठी मनोरंजन सोसायटीची (इएसजी) परवानगी लागते. या व्हिडियोच्या चित्रिकरणाला इएसजीने परवानगी दिली होती का याची चौकशी झाली पाहिजे व परवानगी नसल्यास या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात येईल ते इएसजीने स्पष्ट करावे, अशी मागणी नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी गोवा फॉरवर्डच्या महिला विभागाच्या अध्यक्ष अॅड. आस्मा सय्यद व क्लारा रॉड्रिग्ज उपस्थित होत्या. 

धरण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था असते. व्हिडियो चित्रिकरणासाठी सरकारची, जलसंपदा खात्याची परवानागी नसताना चित्रिकरण होऊच शकत नाही. त्यामुळे या व्हिडियोच्या चित्रिकरणास सरकारने परवानगी दिली असेल, असे मत नाईक यांनी व्यक्त केले. 

ड्रग्जसाठी बदनामी होत असलेल्या गोव्यास सरकारकडून आता पॉर्न केंद्र बनवण्याचा प्रयत्न होत आहे का असा सवाल आस्मा सय्यद यांनी केला. या प्रकरणी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सय्यद यांनी
 केली.

संबंधित बातम्या