Goa Cleanling Campaign: पुढच्या पिढीसाठी जपूया सागर 'संपत्ती'

स्‍वच्‍छता मोहीम 365 दिवस चालू ठेवावी, मुख्यमंत्र्यांचे आवाहन..
Cleanling Campaign
Cleanling CampaignDainik Gomantak

आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिवस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्‍यातील महत्त्‍वाच्‍या 37 समुद्र किनाऱ्यांवर शनिवारी स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात आली. पुढील पिढीसाठी सागर संपत्ती जपली पाहिजे, असे सांगत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही मोहीम 365 दिवस चालू ठेवावी, असे आवाहन केले.

या मोहिमेत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार डॉ. दिव्या राणे, रुडॉल्फ फर्नांडिस (Rudolph Fernandes), भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांच्यासह विविध खात्यांचे पदाधिकारी, तटरक्षक (Coast Guard), अग्निशामक (Firefighters), पोलिस या दलांचे अधिकारी आणि विविध शाळांच्या मुलांनी सहभाग नोंदवला. यावेळी मानवी साखळी करून किनारी स्वच्छतेचे शपथ घेण्यात आली. ('Sea, Sand and Son') ‘सी, सॅण्ड ॲण्ड सन’साठी जगभर प्रसिद्ध असलेले गोव्‍यातील किनारे स्‍वच्‍छ ठेवले तरच पर्यटनाला प्रोत्‍साहन मिळेल.

Cleanling Campaign
Sonali Phogat Case : ‘सीबीआय’ची धडक ग्रॅण्ड लिओनी रिसॉर्टवर

गोवा ‘ड्रग्‍स फ्री’ पर्यटनस्‍थळ करु: राज्यात स्वच्छ पर्यटन व्हावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच अंतर्गत पर्यटनासह आध्यात्मिक आणि वैद्यकीय पर्यटनवाढीस प्राधान्य दिले जात आहे. गोवा ड्रग्स फ्री पर्यटनस्थळ असल्याचे जगभरातील पर्यटकांना सांगावे लागेल. त्यामुळे राज्यात ड्रग्स व्यवहाराला कोणत्याच प्रकारे थारा नाही. असे प्रकार आढळल्‍यास ते तपास यंत्रणांमार्फत संपवण्यात येतील, असा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com