गोवा मार्केट व्यापारी संघटनेचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना निवेदन

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 7 जानेवारी 2021

गोवा मार्केट व्यापारी संघटनांच्या संयुक्त मंचने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली व त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

पणजी: पालिका दुरुस्ती अध्यादेश मारक असल्याने आज अखिल गोवा मार्केट व्यापारी संघटनांच्या संयुक्त मंचने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली व त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी मंचच्या पदाधिकाऱ्यांना अध्यादेशातील ज्या बाबी व्यापाऱ्यांना घातक किंवा हानिकारक आहे त्यासंदर्भात येत्या सात दिवसांत पालिका प्रशासन संचालक व ॲडव्होकेट जनरलांबरोबर बैठक घेऊन चर्चा करा व त्याच्या कायदेशीर बाबी नमूद करून सरकारला द्याव्यात असे सांगितले.

व्यापाऱ्यांनी केलेल्या सूचनांचा कायदेशीर अभ्यास करून त्या पालिका दुरुस्ती अध्यादेशात त्याचा उल्लेख करून नव्याने अध्यादेश काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तूर्त पालिका मार्केट व्यापार दुकाने बंदची दिलेली हाक मागे घेतली आहे, अशी माहिती मंचचे निमंत्रक आशिश शिरोडकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सांगितले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेल्या मंचमध्ये शहरातील विविध पालिका मार्केट व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आणखी वाचा:

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू येणार गोव्यात:  पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठक सुरू -

संबंधित बातम्या