E-Shram Cards : बांधकाम क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम योजनेत सहभागी करणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळी येथे श्रम कार्डांचे वितरण
CM Sawant distributed E-Shram Cards
CM Sawant distributed E-Shram CardsDainik Gomantak

E-Shram Cards : सरकारच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोचण्यासाठी सरकार संवेदनशील आहे. यापुढे संघटीत कामगारांसह बांधकाम क्षेत्रात वावरणाऱ्या कामगारांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

या कामगारांनाही यापुढे बांधकाम कल्याण मंडळाकडून ई-श्रम कार्ड देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे बोलताना दिली.

CM Sawant distributed E-Shram Cards
Bus Service : आंतरराज्य बसचालकांचा मनमानी कारभार

असंघटीत कामगारांना ई-श्रम कार्ड वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. ई-श्रम कार्डाअंतर्गत केंद्र सरकारच्या कामगारांसाठी विमा, पेन्शन आदी विविध योजना असून, कार्डधारक कामगारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी बोलताना केले.

मजूर आणि रोजगार कार्यालयातर्फे शनिवारी (ता.4) साखळी येथील रवींद्र भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मजूर आणि रोजगार आयुक्त श्री. आग्नेलो, उपायुक्त श्री. पेडणेकर, अन्य अधिकारी आणि नगरसेवक आनंद काणेकर उपस्थित होते.

यावेळी मजूर आणि रोजगार कार्यालयातर्फे 170 असंघटित कामगारांना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते ई-श्रम कार्डांचे वाटप करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com