राष्‍ट्रप्रेमाने भारावलेले वातावरण! गोवा मुख्‍यमंत्र्यांची 7.5 कि.मी. पायपीट

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्‍ट्रपिता महात्मा गांधी यांनी 70 जणांना सोबत घेऊन काढलेली दांडीयात्रा. सध्या त्याच मार्गाने आणि त्याच तारखांना दांडी यात्रा 70 युवकांना घेऊन सुरू आहे.

पणजी : स्वातंत्र्यपूर्व काळात राष्‍ट्रपिता महात्मा गांधी यांनी 70 जणांना सोबत घेऊन काढलेली दांडीयात्रा. सध्या त्याच मार्गाने आणि त्याच तारखांना दांडी यात्रा 70 युवकांना घेऊन सुरू आहे. काल या यात्रेचे नेतृत्व करण्याची संधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सुरत (गुजरात) येथे मिळाली. त्यांनी साडेसात किलोमीटर अंतर पायी चालून पार केले.

या अनुभवाविषयी मुख्यमंत्री म्हणाले, दररोज एका नेत्याने यात्रेचे नेतृत्व करण्याचे नियोजन केले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या यात्रेच्या प्रगतीवर लक्ष ठेऊन असतात. काल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यात्रेचे नेतृत्व केले होते. आज मला संधी मिळाली. 

दांडीयात्रेतील अनुभव विलक्षण होता. स्वातंत्र्यानंतर अशी यात्रा निघणे आणि नेमक्या पूर्वीच्याच मार्गाने निघणे आणि पूर्वीच्याच तारखेला तेवढेच अंतर पार करणे याचे स्थानिकांना मोठे अप्रुप आहे. यात्रा पाहण्यासाठी अनेकांची दुतर्फा गर्दी होत असे. तेव्हा ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेविरोधात एल्गार होता आणि आता सद्‍भावना आणि देशप्रेम जागृतीसाठी यात्रा होती. दोन्हींचे उद्देश वेगवेगळे असले तरी यात्रेचा कालावधी वेळ व सहभागींची संख्या समान होती. दांडीयात्रेत 

संबंधित बातम्या