मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मेडिकल कॉलेजला भेट दिली

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 11 मे 2021

गोव्याचे मुख्यंमंत्री प्रमोद सावंत यांनी आज गोवा मेडिकल कॉलेज ला भेट दिली. सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि प्रत्येकाला आवश्यक त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी वैद्यकीय व प्रशासकीय कार्यसंघासमवेत मुख्यमंत्री आज बैठक घेणार आहेत.
 

पणजी: गोव्यात(Goa) सध्या कोरोनाचा(corona) प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे.  त्यातच ऑक्सिजन पुरवठा कमी पडल्याने सध्या जनता आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर दोषारोप करत आहेत. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी कडक संचारबंदी(Lockdown) लागू केल्‍यानंतर काल लॉकडाउनच्या दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांची संख्या घटली नाही. गोव्याचे मुख्यंमंत्री प्रमोद सावंत(CM pramod sawant) यांनी आज गोवा मेडिकल कॉलेज(Goa medical collage) ला भेट दिली. सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि प्रत्येकाला आवश्यक त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी वैद्यकीय व प्रशासकीय कार्यसंघासमवेत मुख्यमंत्री आज बैठक घेणार आहेत.(Chief Minister Dr Pramod Sawant visited Goa Medical College)

ऑक्सिजन पुरवठ्यात विलंब होत आहे परंतु त्यासाठी  आपण डॉक्टरांना जबाबदार धरू शकत नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वैयक्तिकरित्या आज गोमॅकोला भेट देवून ओरोग्यविषयक सुविधांची पाहणी केली. रूग्ण, वैद्यकीय कार्यसंघांची माहिती तसेच सुविधांमधील उणीवा समजून घेण्यासाठी. आमचे डॉक्टर आणि हेल्थकेअर कामगार सर्वोत्तम प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी या भेटीनंतर सांगितले.

 उच्च न्यायालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांची कान उघडणी 

गोव्यात काल दिवसभरामध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या ५० जणांना बळी गेला. आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार राज्यात चोवीस तासांत ६१०७ कोरोना संशयितांची तपासणी करण्‍यात आली. त्यामध्ये २८०४ नवे कोरोनाबाधित सापडले. दिवसभरामध्ये २३६७ जण कोरोनावर उपचार घेत होते, त्‍यांच्‍या प्रकृतीत सुधारणा होऊन ते घरी गेले आहे.

मागील 10 दिवसात गोव्यात झपाट्याने वाढतीये अ‍ॅक्टिव रुग्णसंख्या 

संबंधित बातम्या