Goa Rain: साखळी परिसरात महापूर; 23 जणांना वाचविण्यात यश

सध्या साखळी बाजारपेठेतील पुराचा धोका टळला. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सुपाचीपुड या पुरग्रस्त भागाची पाहणी केली.
Goa Rain: साखळी परिसरात महापूर; 23 जणांना वाचविण्यात यश
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची सुपाचीपुड- हरवळे पुरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केलीTwitter/ @pramod sawant

पावसाने काल दिवसभर व रात्री रौद्रारुप धारण केल्याने साखळीतील वाळवंटी नदीला महापूर आला व पाणी साखळी परसरात शिरल्याने साखळी, हरवळे परिसर पुराच्या विळख्यात सापडला. साखळीतील दत्त मंदीर, क्रिडा मैदान, वाठारेश्वर देवस्थान, तसेच सुपाचे पुड हा गाव पाण्याखाली आला व लोकांची एकच तारांबळ उडाली. साखळी बाजारातील पुर नियंत्रक विभागातील पंप पुन्हा सुरु करुन पाणी नदीत फेकण्याचे काम सुरु केल्यामुळे साखळी बाजारपेठेतील पुराचा धोका टळला. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सुपाचीपुड या पुरग्रस्त भागाची पाहणी केली. (Chief Minister DrPramodPSawant inspected areas flooded due to incessant rains in various parts of Bicholim)

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची सुपाचीपुड- हरवळे पुरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची सुपाचीपुड- हरवळे पुरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केलीचंद्रशेखर देसाई
साखळीचे दत्त मंदीर पाण्याच्या  विळख्यात
साखळीचे दत्त मंदीर पाण्याच्या विळख्यातचंद्रशेखर देसाई

दत्तमंदीर, तोणयेश्वर मंदीर, क्रीडा मैदान पाण्याखाली

साखळीत पाणी वाढल्यामुळे साखळी येथील दत्त मंदीर, म्हावळींगतडचे तोणयेश्वर मंदीर, साखळी बाजारातील पालिका क्रीडामैदान पाण्याखाली आले. त्यामुळे साखळी बसस्थानकावरून बाजारात जाणारा रस्ताच बंद झाला. हा संपुर्ण परिसर पाण्याने व्यापला गेल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली.

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची सुपाचीपुड- हरवळे पुरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली
Goa Flood Updates: गोव्यातील पूर परिस्थितीचे Live Updates

हरवळे- होंडा रस्त्यावर पाणी, वाहतूक वळवली

सुपाचे पुड - हरवळे गावात पाणी शिरल्याने नागरीकांची तारांबळ उडाली. पाणी हरवळे - होंडा या राज्य महामार्ग मुख्य रस्त्यावर आल्याने या मुख्य रस्त्याला जणू नदीचेच स्वरुप प्राप्त झाले. हा रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला. पोलिसांनी त्वरीत या ठिकाणी उपस्थित राहून हरवळे-होंडा मुख्य रस्त्यावरील वाहतूक हरवळे गावातून दुसऱ्या रस्त्याने वळवली. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी तत्काळ सकाळी सुपाचीपुड-हरवळे या भागाची पाहणी केली.

साखळी बाजारातील पाणी पुरवठा विभागाचा पुरनियंत्रक दोन्हीही पंप चालू केले.
साखळी बाजारातील पाणी पुरवठा विभागाचा पुरनियंत्रक दोन्हीही पंप चालू केले. चंद्रशेखर देसाई

पंप पुन्हा सुरु..मात्र बाजार सुरक्षित

पावसाळा सुरु झाला की साखळीतील पुराचा इतिहास डोळ्यांसमोर येतो. त्यामुळे साखळी बाजार परिसरातील लोकांना तीन महिने झोपच लागत नसते. यंदा तर मे मध्येच पाऊस सुरु झाला तो अद्याप थांबण्याची लक्षणेच दिसत नाही. काल रात्रभर पावसाने अक्षरशः थैमान माजवल्याने साखळी परिसरातील लोकांची झोपच उडाली. वाळवंटी नदीने रौद्ररुप धारण केले.वाळवंटी नदी तुडूंब भरण्याचा धोका वाढला.

साखळी येथील वाळवंटी नदी तुडुंब भरल्याने पुराचाधोका वाढला
साखळी येथील वाळवंटी नदी तुडुंब भरल्याने पुराचाधोका वाढलाचंद्रशेखर देसाई
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची सुपाचीपुड- हरवळे पुरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली
Goa, Konkan Monsoon Live Updates: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची पुरग्रस्त भागाला भेट

साखळी बाजारातील नागरिकांमध्ये रात्री घबराट पसरली. बाजारपेठेतील सर्व नागरिक झोप मोडल्याने नागरिक बाजारात जमू लागले. पाणी वाढत चालल्याने साखळी बाजारातील पाणी पुरवठा खात्याच्या पुरनियंत्रक विभागाने रात्रीच पुन्हा एकदा दोन्हीही पंप सुरु करुन पाणी नदीत फेकण्याचे काम चालू केले. पाऊस आणखी तासभरही थांबला असता तर पाणी बाजारात शिरण्याचा धोका वाढला होता. पाऊस थोडा थांबल्यामुळे पाणी बाजारात आले नाही व बाजार सुरक्षित राहीला त्यामुळे बाजारातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी पावसाचा जोर पुढेही कायम राहण्याची संभवना असल्याने नागरिक अद्याप भयभीत अवस्थेतत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com