गोवा मुक्तिदिन सोहळ्याच्यावेळी ७ पोलिस व ३ अग्निशमन जवानांना मुख्यमंत्री सुवर्णपदक प्रदान

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

पोलिस सेवेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी डिचोली उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह सात पोलिसांना तसेच अग्निशमन दलातील तिघा कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री सुवर्णपदक जाहीर झाले आहे.  गोवा मुक्तिदिन सोहळ्यावेळी त्यांना हे पदक देऊन गौरविण्यात आलं आहे.

पणजी पोलिस सेवेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी डिचोली उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच उपअधीक्षक गुरुदास गावडे यांच्यासह सात पोलिसांना तसेच अग्निशमन दलातील तिघा कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री सुवर्णपदक जाहीर झाले आहे.  गोवा मुक्तिदिन सोहळ्यावेळी त्यांना हे पदक देऊन गौरविण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री सुवर्णपदक मिळालेल्यांमध्ये पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर (कोलवा वाहतूक कक्ष), उपनिरीक्षक सुरेंद्र कोमरपंत (मडगाव विशेष शाखा), सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष नाईक (कोकण रेल्वे पोलिस स्थानक), सहाय्यक उपनिरीक्षक विल्सन डिसोझा (पणजी मोटार वाहतूक विभाग), महिला हवालदार अबिना नोरोन्हा (कळंगुट पोलिस स्थानक) तसेच सहाय्यक उपनिरीक्षक दिलीप सिनारी (फोंडा वाहतूक कक्ष) यांचा, तर अग्निशमन दलामधील अशोक परब (उपअधिकारी), दीपक शेटगावकर (अग्निशमन दल जवान) व सीताराम कामत (वॉच रूम ऑपरेटर) यांचा मुख्यमंत्री सुवर्णपदक मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. 

दरम्यान, येत्या २० रोजी गोवा पोलिस स्थापना दिवस पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर साजरा केला जाणार आहे. राज्यातील पोलिस स्थानकांच्या कामगिरीचा आढावा घेऊन सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन पोलिस स्थानकांची निवड केली जाते. यावर्षी कुडचडे पोलिस स्थानकाने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांना फिरता चषक व ३० हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. म्हापसा पोलिस स्थानकाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. त्यांना फिरता चषक व ३० हजार रुपये रोख तसेच वास्को पोलिस स्थानकाला तिसरा क्रमांक मिळाला असून त्यांना फिरता चषक व १० हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त पोलिस सेवेत गेल्या वर्षभरात उत्कृष्ट काम केलेल्या २८ कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक इनसिग्निया पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये फक्त एकाच महिला पोलिसाचा समावेश आहे. 

पोलिस महासंचालक इनसिग्निया पुरस्कार मिळालेल्यांमध्ये पोलिस निरीक्षक विल्सन डिसोझा, निरीक्षक परेश नावेलकर, निरीक्षक विजय सरदेसाई, निरीक्षक आनंद शिरोडकर, निरीक्षक सोमनाथ माजीक, निरीक्षक श्‍याम धुरी, निरीक्षक सुशांत जोशी, निरीक्षक दामोदर नाईक, निरीक्षक सरोज दिवकर, उपनिरीक्षक गोपाळ घाडी, उपनिरीक्षक देवू माणगावकर, सहाय्यक उपनिरीक्षक उल्हास खोत, सहाय्यक उपनिरीक्षक रोक इस्तिबेरो, सहाय्यक उपनिरीक्षक मकरंद पार्सेकर, सहाय्यक उपनिरीक्षक नरेश नाईक, हवालदार सुभाष मालवणकर, हवालदार सदानंद देसाई, हवालदार जीतेंद्र फळदेसाई, महिला हवालदार स्नेहल देसाई, हवालदार सूरज पाटील, हवालदार दामोदर मयेकर, हवालदार मोहन नाईक, हवालदार अमित नाईक, हवालदार सुधीर तळेकर, हवालदार ईश्‍वर कासकर, पोलिस शिपाई अनय नाईक, पोलिस शिपाई पुरुषोत्तम नाईक व पोलिस शिपाई लक्ष्मण कवठणकर यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या