गोवाः मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शहांची भेट; कडक निर्बंध लागण्याची शक्यता

दैनिक गोमंतक
बुधवार, 21 एप्रिल 2021

शाह यांच्याशी आपली भेट झाल्याचे सावंत यांनी सांगितले.

आज “कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी पुढील कृती योजना” जाहीर करणार असल्याचे मुख्यामंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना भेटल्यानांतर सांगितले. सावंत यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली असून  कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची घोषणा केली जाऊ शकते. बुधवारी एचएसएससी परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सावंत यांनी एका माध्यमाला संगीतले. (Chief Minister meets Amit Shah; Possibility of strict restrictions)

आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार

शाह यांच्याशी आपली भेट झाल्याचे सावंत यांनी सांगितले.  प्रमोद सावंत यांनी अमित शहा यांना कोविड व्यवस्थापनाविषयी माहिती दिली आहे, यामध्ये लसीकरण स्थिती आणि ऑक्सिजनची उपलब्धता यांचा समावेश आहे. आम्ही राज्यातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीबद्दलही चर्चा केली असल्याचे सावंत यांनी सांगितले. काल कोरोनामुळे 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रुग्णांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. कोरोनाबाबत पुढील योजनांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासमवेत उद्या राज्यमंत्री उच्चस्तरीय बैठक घेतील, असे सावंत यांनी ट्विट केले आहे.

प्रथम आरोग्यमंत्री विश्वजित राणे, महसूलमंत्री जेनिफर मॉनिसेरेट आणि मुख्य सचिव परिमल राय यांच्यासमवेत उच्चस्तरीय बैठक मुख्यामंत्री घेतील. त्यानंतर, सविस्तर कृती आराखडा तयार करण्यासाठी दुसरी बैठक आयोजित केली जाईल, ज्यासाठी पोलिस महासंचालक (डीजीपी) आणि पोलिस अधीक्षक आणि दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी उपस्थित असतील, असे सावंत यांनी एका माध्यमाला सांगितले.  

संबंधित बातम्या