गोवा पर्यटनाला कोरोना काळातही ग्रीन सिग्नल

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

"गोव्यातील पर्यटकांसाठी सध्या कोणतेही बंधन घातलेले नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवत आहोत आणि त्यानुसार निर्णय घेण्यात येईल,"

पणजी: संपूर्ण देशात आणि राज्यात सध्या कोरोनाने डोक वर काढलं आहे. राज्या आणि केंद्रे सरकार कोरोना कमी करण्यासाठी पर्यत्न करत आहे. कुठे लॉकडाउन तर कुठे संचारबंदी असे निर्बंध लावण्यात आले आले.

अशातच लोकांना पर्यटनाकडे जास्त कल दिसून येतो. गोवा राज्य पर्यटनाच्या दृष्टीने विकसित राज्य आहे. आणि गोव्याला फिरायला जाणे हे सगळ्यांनाच आवडते. गोवा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे, असं म्हणायला हरकत नाही. गोव्यातही कोरोनाचा प्रभाव दिसत आहे. मात्र गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल, "गोव्यातील पर्यटकांसाठी सध्या कोणतेही बंधन घातलेले नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवत आहोत आणि त्यानुसार निर्णय घेण्यात येईल," असे मत व्यक्त केले. 

गोव्याची अर्थव्यवस्था पर्यटनाभोवती फिरते त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पर्यटनावर भर देत असतांना गोव्यात सध्या कोणतेही निर्बंध लावले नाही. गोव्यात कोणतेही लॉकडाऊन किंवा संचारबंदी घालण्यात आली नाही. गोव्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कोणतेही बंधन गोवा सरकारने लावले नाही. मात्र कोरोनाच्या त्रिसुत्री नियमांचे पालन करण्यास गोवा सरकारने गोमंतकीयांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सांगितले आहे.

संबंधित बातम्या