20 वर्षांनंतर सांताक्रुझवासीयांचे स्वप्न पूर्णत्वास! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिस चौकीचे उद्घाटन

20 वर्षांनंतर सांताक्रुझवासीयांचे स्वप्न पूर्णत्वास! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिस चौकीचे उद्घाटन
Pramod Sawant.jpg

पणजी: वीस वर्षापूर्वी सांताक्रुझ (Santa Cruz) परिसरात गुंडांचे वर्चस्व असल्याने या भागात लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यासाठी या भागात पोलिस स्थानक (Police station) किंवा पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली होती. सरकारने तेव्हा जमिनी ताब्यात घेतली होती मात्र पोलिस चौकीचे स्वप्न आता वीस वर्षांनी पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे येथील भागातील लोकांमध्ये असलेली भीती दूर होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister Pramod Sawant) हस्ते या एकमजली इमारत पोलिस चौकीचे उद्‍घाटन झाले आहे. (Chief Minister pramod sawant Inaugurated Santa Cruz Police Outpost0

सांताक्रुझ मार्केटपासून काही अंतरावर 743 चौ. मी. जागेत ही नवीन एकमजली पोलिस चौकी उभी राहिली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे या चौकीचे बांधकाम करण्यात आले असून सुमारे 1 कोटी 56 लाख रुपये खर्च झाले आहेत. पहिल्या मजल्यावर पोलिस चौकी तर पहिल्या मजल्यावर बराकी आहे. गेल्या वीस वर्षापूर्वी ही जमीन पोलिस खात्याने ताब्यात घेतली होती. या पोलिस चौकीची फाईल कित्येक वर्षे निधीअभावी अडली होती. कित्येक पोलिस महासंचालक आले मात्र कोणीही त्यासाठी प्रयत्न केले नाहीत. मात्र पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी पदाचा ताबा घेतल्यापासून पोलिस खात्यात कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नवीन पोलिस स्थानक तसेच पोलिस चौकीचे बांधकामांसाठी निधी मिळवून कामे सुरू केली आहेत.  

सांताक्रुझचे माजी आमदार व्हिक्टर फर्नांडिस यांनी तत्कालिन काँग्रेस सरकारकडे सांताक्रुझ परिसरातील गुन्हेगारी कारवाया तसेच येथे वाढलेली गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस स्थानक किंवा पोलिस चौकी उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. आमदार असताना त्यांनी या प्रस्तावावर अनेकदा विषय मांडला होता मात्र त्याची गंभीरता घेण्यात आली नव्हती. या परिसरात अनेक गँगवॉरच्या घटना घडल्या तरी सरकार किंवा पोलिस खात्याचे डोळे उघडले नव्हते. पोलिस (Goa Police) चौकीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या जागेचा वापर कचरा टाकण्यासाठी तेथील स्थानिकांनी केला होता. ही जागा रस्त्याच्या बाजूनेच असल्याने दुर्गंधीचा त्रास पादचारी तसेच वाहन चालकांना होत होता. 

गुन्हेगारीवर येणार नियंत्रण 

सांताक्रुझ हा भाग जुने गोवे पोलिस स्थानकाच्या अखत्यारित येतो. जुने गोवे पोलिस स्थानकाच्या अखत्यारित रायबंद पोलिस चौकी आहे मात्र चिंबल, मेरशी किंवा सांताक्रुझ या भागात पोलिस चौकी नव्हती. त्यामुळे या भागातील लोकांनी तक्रार दाखल करण्यासाठी जुने गोवे पोलिस गाठावे लागत होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com