पणजीतील बायोडिजास्टर प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

पणजी शहरातील हॉटेल व रेस्टॉरंटमधील टाकाऊ अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी बायोडिजास्टर प्रकल्प उभारणम्यात आला आहे.

पणजी: पणजी शहरातील हॉटेल व रेस्टॉरंटमधील टाकाऊ अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी बायोडिजास्टर प्रकल्प उभारणम्यात आला आहे. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन मंडळाच्या सहकार्याने व ब्रिक्सतर्फे पुरस्कृत या प्रकल्पाचे उद्‍घाटन आज 22  जानेवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. 

गोव्यातील कसिनोची वाहने ‘पार्किंग प्लाझा’मध्ये -

पणजी चर्चजवळील महापालिका उद्यानात आज सकाळी अकरा वाजता आयोजित या कार्यक्रमाला पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, महापालिकेचे आयुक्त संजित रॉड्रिगीस उपस्थित होते. या प्रकल्पाअंतर्गत 300 किलो टाकाऊ पदार्थावर या बायोडिजास्टरद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. टाकाऊ अन्नावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प पणजीत सुरू झाल्यानंतर महापालिकेला बराच दिलासा मिळणार असल्याचे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या