गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

'माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विचारांचा वारसा आम आदमी पक्षच पुढे घेऊन जाऊ शकतो' अशा आशयाचे विधान दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी केले होते.

पणजी:  'माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विचारांचा वारसा आम आदमी पक्षच पुढे घेऊन जाऊ शकतो' अशा आशयाचे विधान दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी केले होते. गेल्या काही दिवसांपासून या विधानानंतर गोव्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आसल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील आम आदमी पक्षाला प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळते आहे.( Chief Minister Pramod Sawant Reacts On Manish Sisodias statement )

मोफत कोरोना तपासणी करणारे गोवा देशातील पहिले राज्य

गोव्याच्या विकासाबद्दल माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न, त्यांच्या निधनानंतर भाजप सरकारने धुळीस मिळवले आहे. त्यांची हे विचार पुढे घेऊन जाण्याची क्षमता आम आदमी पक्षात असून, पर्रीकर यांच्या विचारांबद्दल सहानुभूती असलेल्यांनी आम आदमी पक्षात सहभागी होण्याचे आवाहन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पणजीत पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात बोलताना केले होते. या बद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला. माजी केंद्रीयमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar)हे भारतीय जनता पक्षाचे नेत आहेत व त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्यास भाजप सक्षम आहे. पर्रीकर यांच्या वारसासंदर्भात बोलणारे ते कोण? असा प्रश्‍न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी यावेळी केला. तसेच ज्यांना भाजपमध्ये (BJP) प्रवेश करायचा आहे त्यांनी यावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. 

दरम्यान, मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय गोटातून वेगवगेळ्या प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. आम आदमी पक्षाने (AAP) गोव्यात (GOA) हात- पाय सुरुवात केली असून, आगामी काळात पक्षवाढीसाठी गोव्यात आमदनी पक्ष लक्ष घालणार असल्याचे दिसून येते आहे. 

संबंधित बातम्या