गोव्याला घराणेशाहीची आवश्यकता नाही : प्रमोद सावंत

सरकार युवकांच्या भल्यासाठी सर्वोत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. ज्यामध्ये अनेक योजनांचा समावेश आहे.
गोव्याला घराणेशाहीची आवश्यकता नाही : प्रमोद सावंत
Chief Minister Dr. Pramod SawantDainik Gomantak

पणजी: राज्याला ‘कौटुंबिक राज’ (घराणेशाहीची) आवश्यकता नाही, त्यामुळे तरुणांनी भविष्यातील नेते बनण्यासाठी पुढे यावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी येथे केले. येथे पार पडलेल्या राष्ट्रीय युवा संसदेत (National Youth Parliament) सावंत बोलत होते.

Chief Minister Dr. Pramod Sawant
गोव्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर गंभीर आरोप;पाहा व्हिडिओ

ते म्हणाले, लोकशाही आणि राजकीय क्षेत्रात तरुणांना अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावे. लोकशाहीचे नेतृत्व करण्यासाठी राज्य सरकार तरुणांना सर्वोत्तम मार्गाने तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्यात खाजगी विद्यापीठे स्थापन करुन डिझाईन आणि कौशल्य अभ्यासक्रम निवडण्यासाठी तरुणांना भरपूर वाव आहे.

Chief Minister Dr. Pramod Sawant
'काँगेस' हाच खरा आमचा विरोधक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न्यू इंडिया मिशनशी संबंधित उद्दिष्ट पूर्ण करण्याचे काम केवळ तरुणच साध्य करू शकतात. सरकार युवकांच्या भल्यासाठी सर्वोत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. ज्यामध्ये अनेक योजनांचा समावेश आहे. असेही मुख्यंत्र्यांनी सांगितले.

तंत्रशिक्षण श्रेणीसुधारित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध तरुणाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ज्यामुळे तरुणांना उद्योगाला आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होईल. असे सावंत यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com