मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कोरोना अहवाल आला...

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी करून घेतली असता त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाले आहे.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झालेली नाही त्यांनी आज साखळी येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी करून घेतली असता त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाले आहे. पणजीचे आमदार आतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांना विधानसभा अधिवेशन काळात कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व मंत्री, आमदार आणि विधानसभेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे विधिमंडळ सचिवांनी  सुचवले होते.

मुख्यमंत्र्यांनी आज साखळी येथील आरोग्य केंद्रात आपली तपासणी करून घेतली त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आलेला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने आज सायंकाळी ही माहिती दिली. (Chief Minister Pramod Sawants corona report came)

गोवा विधानसभेत कोरोना चाचणीची लगबग; दिगंबर कामत कोरोना निगेटिव्ह

यापूर्वी मुख्यमंत्र्यांना एक वेळा कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांनी गृह अलगीकरणात स्वतःवर उपचार करून घेतले होते. दरम्यान कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनीही आपली कोरोनाची चाचणी करून घेतली आहे आणि त्यांनाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे दिसून आले आहे.

संबंधित बातम्या