'महामार्ग अन्यत्र नेता येणार नाही' मुख्य़मंत्री प्रमोद सावंतांनी केलं स्पष्ट

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

मोप येथील प्रस्तावित हरित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी रस्ता हा हवाच.

पणजी: मोप येथील प्रस्तावित हरित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी रस्ता हा हवाच. कागदोपत्री रस्ता दाखवला होता त्या आधारेच पर्यावरण दाखला मिळवण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता अन्यत्र नेता येणार नाही. एखाद्याची सर्वच जमीन संपादीत होत असेल तर तेवढी जमीन टाळण्यासाठी रस्ता थोडा बाजूने नेता येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. दाडाचीवाडी - धारगळ येथे आज झालेल्या आंदोलनाविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की त्या ठिकाणच्या जमीन मालकांशी मी दोनवेळा बैठका घेतल्या आहेत.

गोवा पर्यटकांसाठी खुशखबर! IRCTC ने दिले “EXOTIC GOA” टूर पॅकेज,

दोन गावांतील ते जमीन मालक आहेत. त्यांना जमिनीच्या बदल्यात तिप्पट भरपाई देऊ, असे सांगितले आहे. जे कूळ म्हणून नोंद असतील त्यांना भरपाईची निम्मी रक्कम मिळण्याची व्यवस्था करू. सरकारी नोकरीसाठी मदत करू अशी अनेक अश्वासने दिली होती. आधी सर्वेक्षण म्हणजे केवळ पाहणी करू द्या, मग नंतर योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले होते. मात्र त्यांनी पाहणीच करायला दिली नाही. ते म्हणाले, काजूची काही झाडे, काही शेत जमिनीतून हा रस्ता जात आहे. एखाद्याची पूर्ण शेतजमीन जात असेल तर तेवढ्यापुरता रस्ता दुसरीकडे हलवण्याचा विचार करू, असेही आश्वासन मी दिले आहे.  

संबंधित बातम्या