Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak

Michael Lobo : बोटधारकांचा ‘जीईएल'शी करारास नकार; मुख्यमंत्र्यांकडे विषय

ताबा जाण्याची किनाऱ्यावरील बोटचालकांना भीती

Michael Lobo : राज्यातील किनाऱ्यावर जलक्रीडा करणाऱ्या बोटधारकांनी गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडबरोबर जाण्यासाठी नकार दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत आमदार मायकल लोबो यांच्यासमवेत जाऊन मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिल्याचे आमदार लोबो यांनी पत्रकारांना सांगितले.

जलक्रीडा बोट चालविणाऱ्यांचे किनाऱ्यावर दरपत्रक आहे. गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी या बोटधारकांना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न करीत आहे. ही कंपनी आम्हाला बरोबर घेऊन दुसऱ्या कोणा कंपनीकडे हा ताबा दिला जाईल, अशी भीती बोटधारकांमध्ये आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांना भेटून आमदार लोबो यांनी या बोटधारकांचे म्हणणे मांडले.

Michael Lobo
Goa Fire News: पोर्तुगीजकालीन घराला आग; सांताक्रुझमध्ये किमती लाकडी सामानासह नुकसान

लोबो म्हणाले, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 2012 मध्ये नव्या पद्दतीने हा व्यवसाय चालविला जात आहे. काही ठिकाणी इतर बोटधारकांनी दुकाने घातली असून, ते परराज्यात जाऊन जलक्रीडा प्रकाराचे वेगळे दर दाखवितात. त्यामुळे येथील बोटधारकांबाबत गैरसमज निर्माण होत आहे.

गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड ही राज्याचीच कंपनी आहे. ती हे बूथ आपल्या ताब्यात घेत असेल तर येथील व्यावसायिकांच्या स्वतंत्रपणावर गदा येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब टाकली आहे. याबाबत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची भेट घेऊन त्यांनाही या व्यावसायिकांचे म्हणणे सांगितले जाईल.

Michael Lobo
Babush Monserrate : बाबूश यांच्‍या हस्‍तक्षेपामुळे पोलिसांसोबत संंबंध ताणलेले

त्रुटी दूर करणार

गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या दोन बैठकाही झालेल्या आहेत. परंतु या व्यावसायिकांचा त्यांच्याबरोबर जाण्यास नकार आहे. हे व्यावसायिक सर्वप्रकारचे कर भरतात, त्याचबरोबर त्यांचे दर निश्‍चित आहेत. त्यांच्या व्यवस्थापनामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या नक्की सांगाव्यात त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे लोबो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com