मुख्यमंत्र्यांचा आरोप निराधार, बेजबाबदार

 Chief Minister's allegations baseless irresponsible
Chief Minister's allegations baseless irresponsible

पणजी  : सांगेतील आयआयटी प्रकल्प जमिनीच्या सेटींगसंदर्भात प्रयत्न केल्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेले आरोप बेजबाबदार व निराधार आहे. नव्या संजीवनी कारखान्याच्या प्रस्तावावरून झालेल्या वादामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य त्यांच्या पदाला शोभत नसून त्यांच्या या वक्तव्याचा धिक्कार करत आहे. सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेत असून त्याचे पत्र राज्यपालांना देणार आहे. सेटींग प्रकरणाची चौकशी करण्याचे आव्हान आज (बुधवारी) सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे खंडन करताना दिले. 

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार गावकर म्हणाले की, राज्यात आणलेल्या नव्या प्रकल्पांना विरोध नाही मात्र त्यासाठी निश्‍चित केलेल्या जागेचा अभ्यास न करता व लोकांनाही विश्‍वासात न घेतल्याने त्याविरोधात आंदोलने उभी राहत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार एकअंकी असतील. भाजपची धोरणे राज्यात कोलमडत असून ती घेऊन उद्धार होणार नाही. सांगेवासियांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानी घाबरून जाऊ नये. जो विश्‍वास त्यांनी ठेवला आहे तो मी ढळू देणार नाही. मी सांगेच्या लोकांचा स्वाभिमान विकलेला नाही म्हणूनच सांगेचा उद्धार कसा करायचा मला माहीत आहे.

जो विषय लोकांच्या वाईटासाठी होतो त्याला दुजोरा न देता विरोधच असेल. मी सरकारमध्ये असतानाही मुख्यमंत्र्यांनी जे आरोप केले आहेत त्यातून त्यांची मनामध्ये असलेली प्रतिमा उतरली आहे. भाजपचे पदाधिकारी दामादोर नाईक व रमेश तवडकर यांनीही आरोप केले मात्र हे भंगार नेते आहेत. ते पक्षाचे ‘पोपट’ बनले आहेत. विषयाचा अभ्यास न करता बोलवित्याने दिलेल्या विषयावर आरोप करत आहेत. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात किती विकास केला तसेच संजीवनी कारखान्याबाबत त्यांना किती अभ्यास आहे हे उघड करावे, असे गावकर यांनी प्रश्‍न केला.. 


मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले आहे ते त्यांनी सांगे येथील पाईक देवस्थानमध्ये माझ्याबरोबर यावे व नारळावर हात ठेवून पुन्हा
ते सांगावेत व जमिनीच्या व्यवहारासंदर्भात जर सेटींग झाली असल्यास त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असे आव्हान आमदार प्रसाद गावकर यांनी दिले आहे. राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपकडे बहुमत नव्हते तेव्हा ते माझ्याकडे तडजोडीसाठी धावत होते. आता त्यांच्याकडे ‘होलसेल’ आमदार मिळू लागल्याने त्यांना इतरांची कदर राहिलेली नाही अशी टीका त्यांनी केली. 


त्यांच्या आरोपांचे खंडन करताना ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीच सांगेमध्ये आयआयटी प्रकल्प उभारण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले होते. या प्रकल्पासाठी कोठार्ली, रिवण व उगे या तीन ठिकाणची जमीन दाखवण्यात आल्या होत्या. प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेली जमीन कोठार्ली येथे ७० टक्के सरकारी जमीन, २० टक्के खासगी तर १० टक्के कूळ जमीन होती. रिवण येथील १०० टक्के जमीन ही वन खात्याचीच होती त्याचे रुपांतर करणे सरकारला शक्य होते. तिसरी जमीन सोशिएदाद संस्थेची होती. त्यांनी शैक्षणिकसाठी देण्याची तयारी दाखविली होती.

 मात्र या जमिनीसाठी किमान किंमत संस्थेच्या वारसानी मागितली होती तर सरकारला ती मोफत हवी होती. त्यामुळे चर्चा फिसकटली होती. ही प्रक्रिया सुरू असताना पर्रीकरांच्या निधनानंतर विद्यमान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हा प्रकल्प मेळावली (सत्तरी) येथे स्थलांतर केला व त्यामध्येही सेटींग झाले आहे की नाही हे माहीत नाही असा टोमणा
हाणून ते म्हणाले की, सांगेमध्ये आयआयटी प्रकल्प व्हावा यामध्ये माझा स्वार्थ होता मात्र तो या तालुक्यातील लोकांना नोकऱ्या मिळतील व या तालुक्याचा विकास होईल हा त्यामागील उद्देश होता.

संजीवनी कारखाना आऊटसोर्स करण्याचा डाव 
संजीवनी साखर कारखान्यासंदर्भात मी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला होता. त्यांच्याशी चर्चेवेळी त्यांनी या अहवालातील प्रस्तावावर काहीच ऐकून घेतले नाही. राष्ट्रीय किसान योजनेअंतर्गत नवा संजीवनी साखर कारखाना उभारण्याची सूचना मी केली होती. त्यांना या विषयावर बोलण्यासच नकार दिल्याने माझी त्यांच्याबरोबर ठिणगी उडली होती. त्यामुळे त्यांनी निराधार आरोप माझ्यावर करून अपयश लपविण्याचा प्रयत्न केला. नवा संजीवनी कारखाना उभारून तो आऊटसोर्स करण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप आमदार गावकर यांनी केला. 


... तर पाईक देवस्थानसमोर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करावे! 
मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले आहे ते त्यांनी सांगे येथील पाईक देवस्थानमध्ये माझ्याबरोबर यावे व नारळावर हात ठेवून पुन्हा ते सांगावेत व जमिनीच्या व्यवहारासंदर्भात जर सेटींग झाली असल्यास त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असे आव्हान आमदार प्रसाद गावकर यांनी दिले आहे. राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपकडे बहुमत नव्हते तेव्हा ते माझ्याकडे तडजोडीसाठी ते धावत होते. आता त्यांच्याकडे ‘होलसेल’ आमदार मिळू लागल्याने त्यांना इतरांची कदर राहिलेली नाही अशी टीका त्यांनी केली. सरकारी जमिनीत सेटींग करून कमिशन मिळते का? खासगी जमिनीत कमिशन मिळवून दाखवावे असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com